शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुतळेवाडीत स्वाईनफ्लूने रूग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 17:39 IST

सिन्नर : तालुक्यातील रामपूर (पुतळेवाडी) येथील राजेंद्र रतन पवार (४०) यांचा स्वाईन फ्लु आजाराने मृत्यु झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पवार कुटूंबीयांची भेट घेवून माहिती घेतली.

सिन्नर : तालुक्यातील रामपूर (पुतळेवाडी) येथील राजेंद्र रतन पवार (४०) यांचा स्वाईन फ्लु आजाराने मृत्यु झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पवार हे गत पाच-सहा दिवसांपासून आजारी होते. स्थानिक डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुधवारी (दि.२२) रोजी कोपरगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यास सांगितले. डॉक्टरांनी त्यांना स्वाइन फ्लू झाल्याच्या संशयावरून त्यांच्या तोंडातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेत धाडण्यात आले. तसेच त्यादृष्टीने पुढील उपचार देखील सुरू केले होते. दरम्यान शक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मिळालेल्या वैद्यकीय अहवालावरून त्यांना स्वाईन फ्लु झाल्याचे उघड झाले. मात्र त्याच रात्री पहाटे उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, तीन बहीणी असा परिवार आहे.दरम्यान (दि.२५) देवपूर व वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पवार कुटूंबीयांची भेट घेवून माहिती घेतली.