शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात स्वारिपचे भीक मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST

येवला : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करत भीक ...

येवला : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करत भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

विंचुर चौफुलीवरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दुपारी २ वाजता स्वारिपचे कार्यकर्ते जमा झाले. तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे याच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र व राज्य सरकारचाही निषेध केला. त्यानंतर, निषेधाचे फलक, झेंडे घेऊन भीक मांगो आंदोलन सुरू केले. यात परिसरातून सुमारे ७६५ रुपये जमा झाले. सदर रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सरचिटणीस बाळासाहेब आहिरे, महिला आघाडीच्या ॲड.स्मिता झाल्टे, कोषाध्यक्ष महेंद्र खळे यांचीही भाषणे झाली. आंदोलनकर्त्यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार प्रकाश बुरूगळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात विजय घोडेराव, विनोद त्रिभुवन, विजय पगारे, समाधान गुंजाळ, आकाश घोडेराव, वसंत घोडेराव, महेंद्र खळे, संदीप भालेराव, रोहन रणधीर, बाळासाहेब सोनवणे, सुभाष शिकलकर, सुरेश सोनवणे, मयूर सोनवणे, नवनाथ पगारे, सोपान साळवे, मंगेश गायकवाड, गणेश जाधव, बाबासाहेब गायकवाड, सागर घोडेराव, हमजाभाई मन्सुरी, मुस्तफाभाई शेख, गुड्डू शेख, ईलियाज पठाण, सतीश खळे, उत्तम आहिरे, केशव झाल्टे, ज्योती पगारे, उषा पगारे, नंदिनी पगारे, शोभा घोडेराव, सविता आहिरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

इन्फो

...या आहेत मागण्या!

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ कमी करा, रेशन कार्डवर निकृष्ठ दर्जाचे धान्य देण्याऐवजी ५० रुपये किलोने गोडतेल तर १५ रुपये किलोने साखर द्या, कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत २० हजार रुपयांची मदत तातडीने द्या, ज्या महिला कोरोना महामारीने विधवा झाल्या, त्यांना मासिक वेतन चालू करा, खासगी शाळेत चाललेली सक्तीची फी वसुली तत्काळ थांबवा आदी मागण्या करण्यात आल्या.

फोटो- २५ येवला भीकमांगो

येवला शहरात स्वारिपच्या वतीने भीक मांगो आंदोलन करताना पदाधिकारी व कार्यकर्ते.

===Photopath===

250621\25nsk_15_25062021_13.jpg

===Caption===

फोटो- २५ येवला भीकमांगोयेवला शहरात स्वारिपच्या वतीने भीक मांगो आंदोलन करताना पदाधिकारी व कार्यकर्ते.