निफाड : तालुक्यातील दावचवाडी येथील योगेश्वर विद्यालयात कब बुलबुल, स्काउट गाइड शपथविधी व ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्थ प्रभाकर कुयटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना स्काउट गाइडची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्काउट गाइडची प्रार्थना केली. त्यानंतर पाचवीतील विद्यार्थ्यांनी कब बुलबुलचे नियम सांगितले, तर सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी स्काउट गाइडचे नियम सांगितले. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते स्काउट गाइडला टोपी व ओगल स्कार्पचे वाटप करण्यात आले. स्काउट शिक्षक एन. एस. वाघ यांनी शेकोटी गीत सादर केले, तर विद्यार्थ्यांनी समूहनृत्य केले. सूत्रसंचालन रशिद पठाण यांनी केले. दरम्यान, स्काउटशिक्षक एन. डी. शिरसाठ, वैभव कर्डिले, सुरेश बोराडे, अजित इप्पर, सुनील मोगल, कृष्णराज बनकर, जयेश ढोमसे, सोपान घोटेकर, संतोष ससाणे, रुपाली मते, मीना सानप, आदिंनी हा कब बुलबुल व स्काउट गाइड शपथविधी सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
दावचवाडीत स्काउट गाइडचा शपथ सोहळा
By admin | Updated: October 28, 2015 22:53 IST