शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विवेक, विचाराच्या सहाय्याने मानवाने स्वत:चा उद्धार करायाचा स्वामी स्वरूपानंद सरस्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:50 IST

विवेक, विचाराच्या सहाय्याने मानवाने स्वत:चा उद्धार करावयाचा आहे. मानवाने मनामध्ये कुठल्याही प्रकारचा नकारात्मक विचार आणता कामा नये, कारण जीवनात यशस्वी होत असताना, यशोशिखरे सर करताना प्रतिबंध येत असतात. या प्रतिबंधांवर व अडथळ्यांवर सकारात्मक विवेकशक्तीने मात करावी, असे प्रतिपादन वेदांताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

ठळक मुद्देसुश्राव्य व्याख्यानमालेचे चौथे पुष्पमनाच्या संकल्पावर मानवाची क्रिया रविवारी या व्याख्यानमालेचा समारोप

नाशिक : विवेक, विचाराच्या सहाय्याने मानवाने स्वत:चा उद्धार करावयाचा आहे. मानवाने मनामध्ये कुठल्याही प्रकारचा नकारात्मक विचार आणता कामा नये, कारण जीवनात यशस्वी होत असताना, यशोशिखरे सर करताना प्रतिबंध येत असतात. या प्रतिबंधांवर व अडथळ्यांवर सकारात्मक विवेकशक्तीने मात करावी, असे प्रतिपादन वेदांताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.शिवशक्ती ज्ञानपीठ व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील कूर्तकोटी सभागृहात आयोजित सुश्राव्य व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुरुवारी (दि. ९) सरस्वती यांनी गुंफले. ‘मनोनिग्रह’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, या जगात कोणाचेही जीवन सुलभ व सुखी नाही, हे लक्षात घ्यावे. मनाच्या संकल्पावर मानवाची क्रिया अवलंबून असते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे संकल्प शुद्ध असला तर क्रियाही शुद्ध स्वरूपाचीच घडते. मनाचा वापर चांगल्याप्रकारे केल्यास त्याचे परिणामही चांगले दिसतात. मानवाला सर्वाधिक त्रास हा त्याच्या मनापासून होत असतो. मात्र मानव त्याच्या वेदनांवरील उपाय अंतर्मुख होऊन शोधत नाही तर बहिर्मुख होऊन शोधत फिरतो अन् तो येथेच चुकतो, हे समजून घेण्याची गरज असल्याचे सरस्वती म्हणाले. येत्या रविवारी या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे.