लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : श्री स्वामी समर्थ ,जय जय स्वामी समर्थ’ च्या जयघोषात सोमवारी येवला शहरात ठिकठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे मोठयÞा उत्साहात स्वागत करण्यात आले. श्री स्वामी समर्थ पालखीचे (अक्कलकोट)येवल्यात आगमन झाले. त्यानंतर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रापासून श्री स्वामी समर्थ पालखी व पादुका परिक्र मेची मिरवणुक काढण्यात आली.बाहेरगावच्या स्वामी भक्तांना ज्यांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे, प्रकृती अस्वस्थामुळे किंवा परिस्थितीमुळे श्री स्वामींच्या दर्शनास अक्कलकोट येथे येऊन श्रींची सेवा करता येत नाही. अशा माता भिगनी व अबालवृद्धांना व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांच्या दर्शनाचा लाभ व्हावा आण िश्री स्वामींच्या सेवेची संधी लाभावी ह्या उद्देशाने तसेच संस्थानाच्या नियोजीत महाप्रसाद गृह, ध्यानधारणा मंदिर व यात्री भुवन इमारत बांधकम प्रकल्पासाठी तसेच येथे दररोज हजारो स्वामी भक्तांसाठी अविरत चाललेल्या अन्नदानाच्या स्वामी कार्यासाठी निधी उपलब्ध व्हावा ह्या हेतु पोटी सदरच्या श्रींच्या पालखी परीक्र मेचे आयोजन केले जाते. असे पालखी समतिीच्या वतीने सांगण्यात आले. पालखी परिक्र मेच्या स्वागता साठी माजी नगरसेवक संजय कासार, मुकुंद कासार, विनोद पोफळे, नारायण कंदलकर, अरु ण कंदलकर, राजेंद्र चिनगी, दत्तात्रय जाधव,गणेश दोडे यासह श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी, कासार समाजातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वामी समर्थ पालखीची मिरवणूक
By admin | Updated: May 15, 2017 00:14 IST