शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बॅँकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:22 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मार्चअखेर कर्जदार शेतकऱ्यांकडील वसुलीसाठी त्यांची वाहने व मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयाला धडक देत कुलूप लावण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने बॅँकेसमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देसक्तीची कर्जवसुली थांबवा कुलूप लावण्याचा प्रयत्न

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मार्चअखेर कर्जदार शेतकऱ्यांकडील वसुलीसाठी त्यांची वाहने व मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयाला धडक देत कुलूप लावण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने बॅँकेसमोर निदर्शने करण्यात आली.यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाºयांनी बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही सादर केले. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या अध्यक्षांनी कर्जवसुली मोहीम हाती घेऊन त्यासाठी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन केले असून, बॅँकेच्या अधिकारी, कर्मचाºयांकडून शेतकºयांच्या घरी जाऊन पैशांसाठी दमदाटी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.यावेळी पदाधिकाºयांनी बॅँकेच्या मुख्य पायºयांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, दीपक पगार, संदीप जगताप, हंसराज वडघुले, सोमनाथ बोराडे, नाना ताकाटे, सुभाष अहिरे, निवृत्ती गारे, साहेबराव मोरे, निवृत्ती खालकर, श्रावण देवरे, भाऊसाहेब तासकर आदी सहभागी झाले होते. या आहेत मागण्या़़़शेतकºयांची सक्तीची सुलतानी पद्धतीची कर्जवसुली थांबवावी, शेतकºयांच्या ट्रॅक्टरचे लिलाव थांबवून शेतकºयांना ट्रॅक्टर परत देण्यात यावे, सन २००३ ते २०१४ या कालावधीत शेतकºयांना कर्जवाटप करताना त्याची मंजुरी १३ ते १४ लाख रुपयांची असून, शेतकºयांनी ट्रॉलीसाठी कर्ज घेतलेले नसताना त्यांच्या नावावर जास्तीचे कर्ज कसे दाखविण्यात आले याची माहिती द्यावी, बॅँकेच्या संचालकांच्या कर्जाची माहिती प्रसारित करून त्याबाबत श्वेतपत्रिका काढावी, कर्जमुक्तीचा शासन निर्णय असताना व्याज, दंड व सरचार्जेस या दंडात्मक कारवाया थांबवाव्यात आदी मागण्यांचा यात समावेश आहे़