शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या दिवशीही निफाड येथे स्वाभिमानीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:09 IST

निफाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निफाड तहसील कार्यालयावर सुरू असलेले ठिय्या आंदोलन कोणताही निर्णय न झाल्याने गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरू होते.

ठळक मुद्देलेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल

निफाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निफाड तहसील कार्यालयावर सुरू असलेले ठिय्या आंदोलन कोणताही निर्णय न झाल्याने गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरू होते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निफाड तालुक्यातील शेतकºयांच्या प्रश्नाबाबत तसेच रानवड सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे थकीत ५१ लाख ५० हजार रुपयांचे वेतन द्यावे या मागण्यांसाठी निफाड तहसील कार्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या ठिय्या आंदोलनास गुरु वारी विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.दरम्यान, साखर आयुक्तालयाचे प्रतिनिधी, विशेष लेखापरीक्षक (साखर) राजेंद्र देशमुख यांनी गुरुवारी पुन्हा भेट घेऊन आंदोलकांशी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रानवड साखर कारखान्याच्या निविदा प्रसारित करू असे ढोबळ आश्वासन आंदोलकांना दिले; मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.लेखी हमीची मागणी९ सप्टेंबर रोजी सहकारमंत्री व साखर आयुक्त यांची चर्चा होऊन सहकारमंत्र्यांनी आदेश दिला. या घटनेला दीड महिना झाला; मात्र रानवड कारखान्याची निविदा अद्याप का निघत नाही, असा प्रश्न आहे. जर निविदाच निघाली नाही तर रानवड कारखाना यावर्षी चालू कसा होणार, असा प्रश्न केला जात आहे. हे कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप करीत निविदा प्रसारित होण्याची लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असे हंसराज वडघुले यांनी सांगितले.