शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

पावसाची संततधार

By admin | Updated: August 2, 2016 02:27 IST

पाणी सोडले : जिल्ह्यात पुराचा धोका; नदीकाठी सावधानतेचा इशारा

नाशिक : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही आपली हजेरी कायम ठेवल्यामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून, गंगापूर, दारणा व पालखेड या तिन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.

सोमवारी दिवसभर पावसाने कमी, अधिक प्रमाणात आपली हजेरी कायम ठेवली. सकाळी ८ वाजेनंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारी १ वाजेनंतर पुन्हा संततधार लावली. त्यामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम झाला. विशेष करून सायंकाळी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांतून घरी परतणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांची धांदल उडाली, त्याचबरोबर शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला. या पावसामुळे रेल्वे सेवाही विस्कळीत झाली. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, तर सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे गंगापूर धरण क्षेत्रात तसेच धरणाच्या खालच्या बाजूलाही पाऊस कायम असल्याने गोदावरी नदीची पूरपरिस्थिती कायम राहिली, परंतु दिवसभर पावसाची हजेरी लक्षात घेता सायंकाळी पाच वाजता गंगापूर धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. रविवारपासून सुरू असलेल्या २,४६० क्यूसेक पाण्यात एक हजाराने म्हणजेच ३,६४७ इतकी वाढ करण्यात आली, तर दारणा धरणातून ११,६८८ व पालखेडमधून कादवा नदीत ३५० क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास धरण, नदी, नाल्यांच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून नदीकाठच्या गावांना पुरामुळे बाधा पोहोचू शकते, त्यादृष्टीने सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारीही केली जात आहे. ...इन्फो...रविवारी (दि.३१) दुपारपासून गंगापूर धरणातून २७४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडी धरणात सोमवार दुपारपर्यंत एकूण १७३. ४७ दलघफू पाणी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सातत्याने सुरू असलेल्या पावसाने गंगापूर धरणाचीही पातळी वाढली असून, सोमवारपर्यंत गंगापूर धरणात ४५७५ (८१ टक्के) दलघफू पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.