शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ तपस्थानाचा होणार कायापालट

By admin | Updated: February 19, 2017 23:51 IST

पर्यटनस्थळाचा दर्जा : आगर टाकळी रामदास स्वामी मठाचा जीर्णोद्धार

मुकुंद बाविस्कर : नाशिकरामाचा दास म्हणून आयुष्यभर बलोपासनेचे व्रत घेतलेल्या आणि त्यासाठी देशभरात ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारणारे समर्थ रामदास स्वामी यांची तपोभूमी असलेल्या आगर टाकळी तीर्थक्षेत्राचा आता कायापालट होणार असून, या परिसराला क दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळाल्याने या धार्मिक स्थळाकडे भाविकांसह पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या नाशिक परिसरातील अनेक तीर्थस्थानांपैकी एक असलेल्या आगर टाकळी येथे समर्थ रामदास स्वामी यांचे एक तप वास्तव्य होते. वयाच्या १२ व्या वर्षापासून २४ वर्षांपर्यंत अखंड व्यायाम, उपासना व अध्ययन या तिन्ही गोष्टींतून साधना करीत समर्थांना येथे ‘शेणाचा मारुती’ उभारण्याचे सांगण्यात येते. कालौघात हे स्थान काहीसे दुर्लक्षित झाले होते.  दरम्यान, २0१२ पर्यंत न्यायालयीन प्रकरणामुळे या तीर्थक्षेत्राचा विकासही होऊ शकला नाही. परंतु त्यानंतर गेल्या ५ वर्षांपासून श्री मारुती देवस्थान आाणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ, आगर टाकळी संस्थानच्या वतीने शासनाकडे पाठपुरवा करून विकासकामांसाठी विधीची मागणी करण्यात आली, अशी माहिती संस्थानचे विश्वस्त सुधीर शिरवाडकर यांनी दिली. शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आगर टाकळीला वर्षारंभी म्हणजे दीड महिन्यापूर्वीच क दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे. तसेच देवस्थान परिसराच्या सुशोभिकरणासाठी सुमारे पावणेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याअंतर्गत मंदिराचा जीर्णोद्धार, गोदावरी, नासर्डी नदीवर पूल (सांडवा) बांधणे, सभामंडप उभारणे आदिंसह अन्य विकासकामे करण्यात येणार आहेत. याशिवाय वाचनालय, विद्युत रोषणाई ध्वनिव्यवस्था, व्यायामशाळा आदि प्रकल्प हाती घेऊन या तपोभूमीचा आणि तपोस्थानाचा कायापालट करण्यात येणार असल्याचे शिरवाडकर यांनी सांगितले.