शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

संसरी दरोड्यातील संशयित ताब्यात तत्परता : अवघ्या चोवीस तासांत तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:41 IST

देवळाली कॅम्प : फ्लॅटमध्ये दरोड्याचा प्रयत्न करून पती-पत्नीवर हल्ला करून पळून जाणाºया तिघा संशयितांच्या पोलिसांनी २४ तासांत मुसक्या आवळल्या आहेत.

ठळक मुद्देडोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार २४ तासांत मुसक्या आवळल्या

देवळाली कॅम्प : संसरी येथील मोदकेश्वर सोसायटीत रविवारी मध्यरात्री गोकुळ गोडसे यांच्या फ्लॅटमध्ये दरोड्याचा प्रयत्न करून पती-पत्नीवर हल्ला करून पळून जाणाºया तिघा संशयितांच्या देवळाली कॅम्प पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या आहेत.मोदकेश्वर सोसायटीत गोकुळ गोडसे यांच्या फ्लॅटमध्ये रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दोन संशयित इसम दरोडा घालण्याच्या इराद्याने घुसले होते. यावेळी गोकुळ गोडसे हे मित्राचा हळदीचा कार्यक्रम आटोपून पुन्हा घरी आल्याने दोघा दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. यावेळी झालेल्या झटापटीत गोकुळ गोडसे यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले. तर गोकुळ यांची पत्नी दीपाली यांचा हात पिरगळून ढकलून दोघे दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, गुन्हे शाखा उपायुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली देवळालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डौले, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, गुन्हे शाखा कर्मचारी सुनील जमधडे, संजय बोराडे, कृष्णा चव्हाण यांनी दरोडेखोरांची गोपनीय माहिती मिळवून अवघ्या २४ तासांत देवळा येथून संशयित दत्तू रामदास पवार (३५) रा.पिंपळनेर, साक्री; बापू ओंकार पवार (४५) रा. लोहणेर-देवळा व रमेश रामचंद्र शिंदे (६०) यांच्या मुसक्या आवळल्या. तिघा संशयितांना मंगळवारी नाशिकरोड न्यायालयामोर उभे केले असता गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.