शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

संशयास्पद लिकेज ;आता थेट पाइपलाइन फोडूनच इंधन चोरीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:59 IST

पूर्वी टँकर्समधून इंधन चोरीचे प्रकार घडायचेत. त्यासाठी जिल्ह्यातील घाटनदेवी परिसरासारखे काही अड्डे प्रसिद्धही होते. पण काळ बदलला तसे चोरीचे तंत्रही बदलले म्हणायचे. आता थेट पाइपलाइन फोडूनच इंधन चोरीचे प्रयत्न होऊ लागले आहेत. पानेवाडीतील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची मनमाड-मुंबई दरम्यानची डिझेल पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे फोडण्याचा प्रकार तशातलाच म्हणता यावा.

ठळक मुद्देसंशयास्पद लिकेजआता थेट पाइपलाइन फोडूनच इंधन चोरीचे प्रयत्न

पूर्वी टँकर्समधून इंधन चोरीचे प्रकार घडायचेत. त्यासाठी जिल्ह्यातील घाटनदेवी परिसरासारखे काही अड्डे प्रसिद्धही होते. पण काळ बदलला तसे चोरीचे तंत्रही बदलले म्हणायचे. आता थेट पाइपलाइन फोडूनच इंधन चोरीचे प्रयत्न होऊ लागले आहेत. पानेवाडीतील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची मनमाड-मुंबई दरम्यानची डिझेल पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे फोडण्याचा प्रकार तशातलाच म्हणता यावा.मनमाडनजीकच्या पानेवाडी येथील प्रकल्पातून लगतच्या सहा राज्यांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जातो. त्यासाठी मुंबई-पानेवाडी दरम्यान जमिनीत ८ ते १0 फूट खोलीवर पाइपलाइन टाकण्यात आली आहे. इंधन चोरांनी अगदी दहा फुटांचा खड्डा खोदून व चक्क ड्रिल मशीनद्वारे ही पाइपलाइन फोडली आहे, यावरून या क्षेत्रातील इंधन माफियांचे तंत्रही कसे विकसित झाले आहे व त्यांचे धाडसही किती बळावले आहे याचा अंदाज बांधता यावा. विशेष म्हणजे खानगाव थडीतील प्रकाराच्या दोनच दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातही असाच प्रयत्न केला गेला. त्यामुळे इंधन माफियांची आंतरराज्यीय टोळीच कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जाणे स्वाभाविक ठरले आहे. काही वर्षांपूर्वी याच प्रकल्पाच्या परिसरात यशवंत सोनवणे नामक वरिष्ठ दर्जाच्या महसूल अधिकाºयाचा जाळून खून करण्यात आला होता. त्यानंतर बºयापैकी खबरदारीचे उपाय योजले गेले होते. जेवणाच्या ढाब्यांवर टँकरमधून इंधन चोरीचे प्रकार चालायचे, त्यामुळे यावर करडी नजर ठेवली गेल्याने या परिसरातील अनेक ढाबेही बंद पडलेत. पण म्हणून इंधन माफियांनी त्यांचे काळे धंदे सोडले नाहीत. त्यांनी थेट प्रकल्पाची पाइपलाइनच फोडण्याची करामत करून दाखविली. त्यामुळे आता याहीदृष्टीने उपाययोजनांवर लक्ष दिले जाणे गरजेचे ठरले आहे. यात सद्यस्थितीत पाइपलाइन फोडली गेल्यावर त्याची माहिती मिळण्याची व्यवस्था आहे. परंतु ही झाली पश्चात व्यवस्था. याऐवजी देशभर अंथरल्या जाणाºया गॅस पाइपलाइनच्या संरक्षणासाठी ज्याप्रमाणे गॅस अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया (गेल)कडून या पाइपलाइनच्या आसपास फिरकणाºयांचीही माहिती मिळण्याचे जे ‘बाइवरेशन डिटेक्शन’ तंत्र वापराचे प्रयत्न सुरू आहेत, तशीच यंत्रणा पानेवाडीतील डिझेल-पेट्रोल पाइपलाइनच्या बाबतीतही कार्यान्वित करता येईल का हे बघितले जाणे गरजेचे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा विषय केवळ इंधन चोरी व भेसळ असा मर्यादित नाही. अशा प्रयत्नातून जे पेट्रोल-डिझेल जमिनीत मुरते तसेच परिसरातील विहिरीत उतरून लगतच्या नदीतही मिसळते, त्याने होणारी पर्यावरणाची हानी तसेच जलचरांच्या जीविताला होणारा धोका व शेतकरी बांधवांवर ओढवणारी नापिकी यासारख्याही काही बाबी गंभीर ठरणाºया आहेत. खानगाव थडीला झालेल्या इंधन चोरीच्या प्रयत्नातूनही असेच घडून आले आहे. त्यामुळे चोरीचा गुन्हा नोंदविला गेला असला आणि त्यादृष्टीने पोलिसी तपासाची चक्रे फिरू लागली असली तरी, ज्या परिसरात इंधन लिकेज झाले आहे व ते विहिरीच्या पाण्यातही उतरलेले दिसून येत आहे त्याच्या चौकशीचे, पंचनाम्याचे व त्यातून ओढवणाºया नुकसानीचे काय; असा प्रश्न कायम आहे. तेव्हा इंधनमाफियांची वाढलेली हिंमत पाहता पेट्रोल-डिझेल वाहिनी फोडण्याचे प्रकार टाळण्यासंदर्भात उपाययोजना करतानाच इंधनाच्या झिरप्याने होणाºया शेतजमिनीच्या नुकसानीचाही विचार कंपनीकडून केला जाणे अपेक्षित आहे.