उपनगर : तपोवनात साधूंची रेलचेल वाढली असून अमली पदार्थ विकणारे काहीजण तपोवनात दाखल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. साध्या वेशातील पोलिसांनी मंगळवारी दुपारी अमली पदार्थ विक्री करण्याच्या संशयावरून साधू वेशातील ढोंगी इसमाला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये गांजाच्या पुड्या आढळून आल्याची परिसरात चर्चा आहे. साधुग्राममध्ये गांजा विक्री होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांकडून दडवली जात असली तरी आजच्या कारवाईवरून पोलीस गंभीर असल्याचे दिसून येते. दरम्यान, पंजाबमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन साधुग्राम परिसरात मंगळवारी दुसऱ्या दिवशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवून वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपोवनात अमली पदार्थ विक्रीचा संशय
By admin | Updated: July 29, 2015 01:05 IST