शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

मागील तारखेने निलंबन रद्द करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:27 IST

नाशिक : त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयातील कर्मचाºयाला जिल्हाधिकाºयांनी तीन महिन्यांपूर्वी निलंबित केलेले असताना तहसीलदाराने परस्पर सदर कर्मचाºयाला कामावर नेमण्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच जिल्हा प्रशासनाने सारवासारव करून सदरची बाब लपविण्याचा प्रयत्नदेखील अंगलट आला आहे. आठ दिवसांपूर्वीच कर्मचाºयाला रुजू करून घेण्याचे आदेश बजावण्यात आल्याचा छातीठोक दावा करणाºया प्रशासनाकडे मात्र कर्मचाºयाचे निलंबन मागे ...

ठळक मुद्देनिलंबित कर्मचाऱ्याबाबत प्रशासनाची सारवासारव

नाशिक : त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयातील कर्मचाºयाला जिल्हाधिकाºयांनी तीन महिन्यांपूर्वी निलंबित केलेले असताना तहसीलदाराने परस्पर सदर कर्मचाºयाला कामावर नेमण्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच जिल्हा प्रशासनाने सारवासारव करून सदरची बाब लपविण्याचा प्रयत्नदेखील अंगलट आला आहे. आठ दिवसांपूर्वीच कर्मचाºयाला रुजू करून घेण्याचे आदेश बजावण्यात आल्याचा छातीठोक दावा करणाºया प्रशासनाकडे मात्र कर्मचाºयाचे निलंबन मागे घेतल्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेशच नसल्याचे चौकशीअंति निदर्शनास आले आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हलदर ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख कळविण्यात कुचराई केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाºयांनी जून महिन्यात त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार कनोजे, लिपिक देशमुख या दोघांनाही निलंबित केले. तथापि, गणेश विसर्जन काळात त्र्यंबकेश्वर तहसीलदारांनी निलंबित लिपिक देशमुख यांना परस्पर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपविल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच, हादरलेल्या प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्र्यंबकेश्वर तहसीलदार व सदर कर्मचाºयाला पाठीशी घालण्याचा भाग म्हणून सदर कर्मचाºयाचे निलंबन आठ दिवसांपूर्वीच मागे घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. परंतु प्रस्तृत प्रतिनिधीने त्याबाबत चौकशी केली असता, निलंबन मागे घेण्याची टिपणी तयार असून, त्यावर जिल्हाधिकाºयांची स्वाक्षरी झाली की नाही याबाबत कोणीच खात्री दिली नाही. त्यामुळे जर निलंबन मागे घेण्याचे आदेशच पारित झाले नाही तर सदर कर्मचाºयाला पुन्हा विनाआदेशच रुजू करून घेतले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेष म्हणजे निलंबित झालेल्या लिपिकाचे चांदवड मुख्यालय असताना गेल्या तीन महिन्यांत ते तेथे हजर तर झालेले नाहीतच शिवाय प्रशासनाने ज्या कारणावरून निलंबित केले त्या प्रशासनाने कनोजे व देशमुख या दोघांवर दोषारोपपत्रदेखील ठेवलेले नाही. त्यामुळे दोषारोपपत्र न ठेवता निलंबन व आदेश पारित न करताच कामावर रुजू करून घेण्याचे अनोखा प्रकार महसूल खात्यात सुरू झाल्याचे बोलले जात आहे. होलदारनगर ग्रामपंचायत रिक्तज्या होलदारनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तारखा कळविण्यात कुचराई केली म्हणून जिल्हाधिकाºयांनी नायब तहसीलदार व लिपिकास निलंबित केले, त्या होलदारनगर ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी मतदान होणार होते. परंतु एकाही उमेदवाराने नामांकन न भरल्याने ग्रामपंचायतीसाठी मतदानच घेण्यात आलेले नाही. त्यामुळे एकूणच या साºया प्रकरणाचा गुंता व गूढ आणखी वाढले आहे.