शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीच्या उंबरठ्यावर वैद्यकीय अधिकाऱ्याचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 19:47 IST

मायको रुग्णालय : आयुक्तांकडून निलंबनाचे आदेश जारी

ठळक मुद्दे डॉ. कोकणी हे येत्या ३१ आॅक्टोबरला सेवानिवृत्तकंत्राटी कर्मचारी श्रीमती देशमुख यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाणार

नाशिक : पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयातील महिलेच्या प्रसूतीप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यासह चार परिचारिकांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. कोकणी हे येत्या ३१ आॅक्टोबरला सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, निवृत्तीच्या उंबरठ्यावरच कोकणी यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.पंचवटीतील मायको रुग्णालयात गेल्या सोमवारी (दि.२३) एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली असता रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह सर्व परिचारिका आॅनड्युटी गायब होत्या. त्यामुळे वेळेवर मदत न मिळाल्याने सदर महिलेची प्रसूती तिला रुग्णालयात घेऊन आलेल्या रिक्षातच झाली होती. या साºया प्रकाराची गंभीर दखल प्रशासनाने घेत तातडीने चौकशी केली होती. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी वैद्यकीय अधिकाºयासह पाच परिचारिकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली होती, तर सुरक्षारक्षकाच्या बडतर्फीचा प्रस्ताव प्रशासन उपआयुक्तांकडे पाठविला होता. मात्र, दुसºयाच दिवशी डेकाटे यांनी निलंबनाच्या प्रक्रियेऐवजी कर्मचाºयांची खातेनिहाय चौकशी केली जाणार असल्याचे सांगत एकूणच प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय निर्माण केला होता. परंतु, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सदर प्रकार विसंवादातून झाल्याचे सांगत वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी, परिचारिका मनीषा शिंदे, सरला रूपवते, भारती कोठारी आणि एम. एम. ठाकूर यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. कंत्राटी कर्मचारी श्रीमती देशमुख यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाणार असून, त्याबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव वैद्यकीय विभागाकडून मागविल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. निलंबित करण्यात आलेले डॉ. हिरामण कोकणी हे दि. ३१ आॅक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्तीला अवघा आठवडा उरला असताना डॉ. कोकणी यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ जवळ आल्याने विभागीय चौकशी करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने निलंबनाची कारवाई केली गेली.परदेश दौऱ्याचीही होणार चौकशीवैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यासह एक परिचारिका आणि महापालिकेच्याच आणखी एका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हे विनापरवानगी परदेश दौºयावर गेल्याची चर्चा आहे. मात्र, त्याबाबत महापालिकेकडे कोणताही अधिकृत खुलासा आलेला नाही. सध्या या अधिकाºयांची विभागीय चौकशी केली जाणार असून, त्यानंतर त्यांच्या पासपोर्टसह अन्य बाबींबाबत लक्ष घालण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले.

 

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाhospitalहॉस्पिटल