शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरच्या विकास आराखड्याला स्थगिती

By admin | Updated: May 30, 2017 01:05 IST

नाशिक : त्र्यंबक नगराध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी झटका दिला असून, नगरपालिकेने मंजूर केलेल्या विकास आराखड्याला स्थगिती दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीचा विकास आराखडा तयार करताना हरित पट्ट्याचे पिवळ्या पट्ट्यात रूपांतर करण्याचा ठराव परस्पर घुसविणाऱ्या त्र्यंबक नगराध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच झटका दिला असून, सोमवारी त्यांची झाडाझडती घेतानाच नगरपालिकेने मंजूर केलेल्या विकास आराखड्याला स्थगिती दिली आहे. गेल्या महिन्यापासून हा विषय गाजत असून, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष विजया लढ्ढा मे महिन्यात रजेवर असल्याच्या काळातच त्यांनी त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यात झोन बदलाचा प्रस्ताव मंजूर केल्याचे पत्र नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. मुळातच त्र्यंबकेश्वर व परिसराचा भाग हा इको झोन तसेच ना विकास क्षेत्र म्हणून शासनाने यापूर्वीच जाहीर केला असून, नगरपालिका हद्दीला लागून असलेल्या परिसर हा हरित पट्टा आहे. असे असताना सुमारे १९४ हेक्टरमधील हरित पट्ट्याचे पिवळ्या पट्ट्यात म्हणजेच निवास क्षेत्रासाठी खुले करण्याचा निर्णय त्र्यंबक नगराध्यक्षांनी घेतल्याची बाब गंभीर मानली गेली. त्यातही हा सारा प्रकार नगराध्यक्षांच्या पतीने काही बांधकाम व्यावसायिकांच्या सांगण्यावरून केल्याची तक्रार त्र्यंबकेश्वरच्या जवळपास तेरा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याचबरोबर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनीदेखील नगराध्यक्षांनी दिलेल्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषयावर चर्चा झालेली नसतानाही परस्पर इतिवृत्तात विषय घुसवून झोन बदलाचा निर्णय घेतल्याप्रकरणी नगराध्यक्षांवर कारवाई करण्याची शिफारस केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबक नगराध्यक्षांना पत्र पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी त्यांच्या पतीसह जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी ते पत्र आपले नाहीच असा पवित्रा घेणाऱ्या लढ्ढा यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले. सुटीवर असताना पत्र कसे देऊ शकतात, अशी विचारणा करून त्यासंदर्भात कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. सायंकाळी मात्र त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने मंजुरीसाठी पाठविलेल्या विकास आराखड्याला स्थगिती देण्यात आली.