शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनासाठी ५० कोटींचे कर्ज नाकारणारा ठराव निलंबित

By admin | Updated: July 22, 2016 00:38 IST

स्थायीला दणका : नगरविकास विभागाचा निर्णय

नाशिक : महापालिकेस सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भूसंपादन प्रकरणातील जमिनींचा मोबदला देण्यासाठी ५० कोटी रुपये कर्ज उभारण्यास नकार देणारा स्थायी समितीचा ठराव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने निलंबित केला आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सदरचा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविला होता.सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भूसंपादन प्रकरणातील जमिनींचा मोबदला देण्यासाठी महापालिकेने ५० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याची परवानगी शासनाकडे मागितली होती. शासनाच्या मंजुरीनंतर महापालिकेने शहरातील काही राष्ट्रीयीकृत व खासगी बॅँकांना पत्र देऊन १५ वर्षे कालावधीकरिता देकार मागविले होते. त्याअनुषंगाने प्रशासनाने प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला होता. परंतु स्थायी समितीच्या २४ जून २०१५ रोजी झालेल्या सभेत सदरचा कर्जाचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. सदर कर्ज उभारणी ही सिंहस्थ कामांशी निगडित असल्याने आणि या प्रस्तावास मंजुरी मिळण्याच्या अधीन राहूनच भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने स्थायीच्या भूमिकेमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता तत्कालीन आयुक्तांनी वर्तविली आणि सदरचा प्रस्ताव विखंडित करण्यासाठी शासनाला पाठविला. सदरचा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने निलंबित केला असून, त्याबाबतचे अभिवेदन स्थायीकडून मागविले आहे. (प्रतिनिधी)