शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

 सात महिन्यांपासून फरारसाबळे खुनातील संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:54 IST

नाशिक : पेठरोडवरील सराईत गुन्हेगार किरण निकमच्या खुनातील संशयित बंडू मुर्तडक ऐवजी त्याच्या चेहºयाशी साधर्म्य असलेल्या कसारा येथील निष्पाप तुषार साबळे या तरुणाच्या खुनातील संशयित शुभम पवार यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने बुधवारी (दि़१०) मुंबईतील चेंबूर परिसरातून अटक केली आहे़ नाशिकरोड परिसरातील मंगलमूर्तीनगरमध्ये २५ मे रोजी निष्पाप तुषार साबळे या युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती़

ठळक मुद्दे शहर गुन्हे शाखेची कामगिरीमुंबईतील चेंबूर परिसरातून अटक

नाशिक : पेठरोडवरील सराईत गुन्हेगार किरण निकमच्या खुनातील संशयित बंडू मुर्तडक ऐवजी त्याच्या चेहºयाशी साधर्म्य असलेल्या कसारा येथील निष्पाप तुषार साबळे या तरुणाच्या खुनातील संशयित शुभम पवार यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने बुधवारी (दि़१०) मुंबईतील चेंबूर परिसरातून अटक केली आहे़ नाशिकरोड परिसरातील मंगलमूर्तीनगरमध्ये २५ मे रोजी निष्पाप तुषार साबळे या युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती़पंचवटी-पेठरोड परिसरातील सराईत गुन्हेगार किरण राहुल निकम याचा भाजीपाला व्यवसायाच्या वादातून गतवर्षी १९ मे रोजी संशयित संतोष उघडे, संतोष पगारे, गणेश उघडे, बंडू मुर्तडक व त्यांच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली होती़ या खुनाचा सूड घेण्यासाठी मयत किरणचा भाऊ शेखर निकम याने बंडू मुर्तडकच्या खुनाचा कट रचला होता़ त्यानुसार २५ मे २०१७ रोजी बंडू मुर्तडक हा उपनगर परिसरातील मंगलमूर्तीनगरमधील हर्ष अपार्टमेंटमध्ये आल्याची माहिती मिळाल्याने शेखर निकम व त्याचे सात-आठ साथीदार दुपारी चार वाजेच्या सुमारास ओम्नी, अल्टो व इंडिगो कारमधून पोहोचले़ त्यांनी बंडू मुर्तडक समजून त्याच्या चेहºयाशी साधर्म्य असलेला कसारा येथील तुषार भास्कर साबळे या युवकावर गोळीबार तसेच धारदार शस्त्राने वार करून खून केला व फरार झाले़वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, पोलीस हवालदार रवींद्र बागुल, पोलीस शिपाई विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, राहुल पालखेडे, दीपक जठार यांनी शिताफीने चेंबूर येथून अटक केली़ गुन्हे शाखेने संशयित पवार यास उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे़ पोलिसांनी शेखर निकम व त्याच्या साथीदारांना औरंगाबादमधून अटक केली़ मात्र, साबळेच्या खुनातील संशयित शिवम ऊर्फ शुभम सुरेश पवार (रा़ महालक्ष्मी चाळ, वाल्मीक मंदिराच्या मागे, द्वारका, नाशिक) हा तेव्हापासून फरार झाला होता़ गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस शिपाई स्वप्नील जुंद्रे यांना फरार पवार हा म्हाडा वसाहत, माहुल गाव, चेंबूर, मुंबई येथे असलयाची माहिती मिळाली होती़