शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कवडासर खून प्रकरणी संशयित अटकेत

By admin | Updated: June 15, 2015 23:25 IST

कवडासर खून प्रकरणी संशयित अटकेत

दिंडोरी : कवडासर येथील सरपंच सरु बाई जयराम गवळी व त्यांचे पती जयराम ठमा गवळी यांच्या हत्त्येप्रकरणी एका संशयित आरोपीस दिंडोरी पोलिसांनी अटक केली असून, आपल्या घरी का आला या संशयावरून वृद्धाचा खून केल्याचा प्रकार प्राथमिक तपासात पुढे आला आहे.याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कवडासर येथील सरपंच सरूबाई जयराम गवळी व त्यांचे पती जयराम ठमा गवळी यांच्या हत्त्येप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरत तपास करत रात्री उशिरा या हत्त्याकांड प्रकरणी गावातीलच किसन नामदेव गवळी (३२) यास ताब्यात घेतले असता गुन्ह्याची उकल झाली आहे. मयत जयराम गवळी हे परिसरात भगत म्हणून परिचित होते. त्यांचे संशयित आरोपी किसन यास त्याचे घरी येणे-जाणे पसंत नव्हते. तो त्याच्यावर संशय घेत होता. शनिवारी रात्री किसन हा शेतात पाखरे मारून घरी आला असता त्याला जयराम गवळी तेथे उभा आढळल्याने त्याला राग अनावर झाला व त्याने जयराम यास धमकावले. यानंतर जयराम याने तेथून पळ काढला; मात्र किसन याने त्यास नाल्याजवळ गाठत त्याचेवर कोयत्याने वार करत दगडाने ठेचून मारले. यानंतर त्याने घरात झोपलेल्या असलेल्या सरपंच सरूबाई गवळी यांचेवरही कोयत्याने हल्ला करत ठार मारले. दिंडोरी पोलिसांनी किसन यास अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर गणकवार हवालदार बोरसे करत आहे.(वार्ताहर)