वणी : अल्पवयीन मुलीचे अपहरण व अत्याचार प्रकरणी संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून, मुलीच्या अपहरण प्रकरणात संशयिताला मदत करणाऱ्या दोघांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथील सुनील सुरेश कावळे याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला गुजरात राज्यातील सुरत येथे सदर संशयित घेऊन गेला होता. मुलीच्या अपहरणाची तक्रार पालकांनी केल्यानंतर संशयित कावळे याच्या मित्रांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क होत असल्याचा सुगावा यंत्रणेला लागला होता. मुलीच्या अपहरण प्रकरणात कावळे याच्या दोन मित्रांनी मदत केल्याचे पुढे आल्याने कावळे व त्याच्या दोन मित्र अशा तिघांवर तपासाअंती गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान, नाशिक न्यायालयात तिघांना हजर केले असता कावळे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर त्याच्या दोन्ही मित्रांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. कावळे याचे दोन मित्र दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी येथील आहेत.(वार्ताहर)
संशयितास पोलीस कोठडी
By admin | Updated: August 12, 2016 22:17 IST