शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सासूसह बालकाची हत्या करणारा संशयित गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:20 IST

मखमलाबाद शिवारातील गांधारवाडी परिसरात राहणाºया सासूसह मेहुणीच्या आठ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या करून फरार असलेला रामवाडी (तळेनगर) येथील संशयित मोतीराम धोंडीराम बदादे याला पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी (दि.२३) महामार्गावरील ठक्कर बझार परिसरातून अटक केली आहे. बदादे हा सव्वा महिन्यापासून फरार होता.

पंचवटी : मखमलाबाद शिवारातील गांधारवाडी परिसरात राहणाºया सासूसह मेहुणीच्या आठ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या करून फरार असलेला रामवाडी (तळेनगर) येथील संशयित मोतीराम धोंडीराम बदादे याला पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी (दि.२३) महामार्गावरील ठक्कर बझार परिसरातून अटक केली आहे. बदादे हा सव्वा महिन्यापासून फरार होता. बदादे याने सासू मंदाबाई दशरथ खराटे (५५), मेहुणीचा मुलगा नैतिक लिलके (८) यांची रामवाडी परिसरातील चौघुले पेट्रोलपंपासमोर असलेल्या दाट झाडीत हत्या करून सासरे दशरथ सोनू खराटे यांच्यावरही खुनी हल्ला केल्याची घटना (दि.१३) जुलैला उघडकीस आली होती. गेल्या जुलै महिन्यात बदादे याने पाथर्डी फाटा परिसरात राहणाºया सासू मंदाबाई खराटे व मेहुणीचा मुलगा नैतिक लिलके यांना काहीतरी खोटे सांगून दुचाकीवर बसवून चौघुले पेट्रोलपंपासमोर असलेल्या मोकळ्या दाट झाडीत नेले व तेथे दोघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर संशयिताने सासरे दशरथ खराटे यांना गाठून सासू व नैतिक यांना भामट्यांनी रस्त्यात लुटले आणि लूटमार करणारे पैशांची मागणी करीत असल्याचे खोटे सांगून सासºयाला चौघुले पेट्रोलपंपासमोर मोकळ्या जागेत नेले. मात्र घटनास्थळी रक्ताचे डाग व पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघून त्यांनी पळ काढला. त्यावेळी संशयिताने त्यांच्या डोके व हातावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. जावयाच्या तावडीतून सुटका करून खराटे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.बुधवारी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना खून प्रकरणातील फरार संशयित बदादे हा ठक्कर बझार परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, हवालदार मोतीराम चव्हाण, आप्पा गवळी, सचिन म्हसदे, सतीश वसावे, भूषण रायते, बस्ते आदींनी ठक्कर बझार परिसरात सापळा रचून बदादे याला बेड्या ठोकल्या.