शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उगलमुगले खुनातील संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:06 IST

उगलमुगले खुनातील संशयितास अटक पंचवटी : वाल्मीकनगर परिसरातील युवकाचे अपहरण व खून प्रकरणातील फरार संशयित गोपाळ गोसावी यास पंचवटी पोलिसांनी रविवारी (दि़८) कसारा रेल्वेस्थानकाबाहेरून ताब्यात घेतले़ गत अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या गोसावीच्या मागावर पोलीस होते़

पंचवटी : वाल्मीकनगर परिसरातील युवकाचे अपहरण व खून प्रकरणातील फरार संशयित गोपाळ गोसावी यास पंचवटी पोलिसांनी रविवारी (दि़८) कसारा रेल्वेस्थानकाबाहेरून ताब्यात घेतले़ गत अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या गोसावीच्या मागावर पोलीस होते़वाल्मीकनगर येथे राहणाºया जालिंधर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले याचे संशयितांनी दोन वर्षांपूर्वी अपहरण करून खून केला़ तर उगलमुगलेच्या नातेवाइकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. तब्बल पावणेदोन वर्षे उलटूनही या प्रकरणाचा तपास लागलेला नव्हता. पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळालेल्या माहितीवरून संशयित अविनाश कौलकर, रोहित कडाळे, श्याम महाजन, कुंदन परदेशी, राकेश कोष्टी आदी पाच संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या सांगण्यावरून उगलमुगले याचा खून केल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी शेट्टी यांनाही अटक केली़दरम्यान, उगलमुगले खून प्रकरणातील संशयित गोसावी हा रविवारी (दि़८) कसारा येथे असल्याची माहिती मिळाली असता सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, उत्तम खरपडे, जितेंद्र पवार, बाळासाहेब वाघ, मधुकर पिंपळके यांंनी कसारा रेल्वेस्थानकाबाहेरून गोसावीला ताब्यात घेतले.