शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

सूर्यकांत शिंदे : भालेकर मैदानावर आयोजित शासकीय योजनांच्या मेळाव्याप्रसंगी प्रतिपादन; मेळाव्यात विविध विभागांच्या योजनांची माहिती शासकीय योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:59 IST

नाशिक : शासकीय योजनांच्या न्यायापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद, तहसील, समाजकल्याण, जिल्हा उद्योग के ंद्र, वनविभाग यांच्यासह विविध विभागांच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजे.

ठळक मुद्देडॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते उद्घाटन विविध शासकीय योजनांविषयी माहिती

नाशिक : न्याय सर्वांसाठी एकच असून, विविध शासकीय योजना सर्वांच्या न्याय हक्कासाठीच असतात. त्यामुळे शासकीय योजनांच्या न्यायापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद, तहसील, समाजकल्याण, जिल्हा उद्योग के ंद्र, वनविभाग यांच्यासह विविध विभागांच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजे. प्रत्यक्षात लाभ मिळेपर्यंत पाठपुरावा केला पाहिजे व दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन विधी सेवा प्राधिकरणाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे यांनी केले. नाशिक येथील बी. डी. भालेकर मैदानावर शासकीय योजनांच्या मेळाव्याचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते मंगळवारी (दि.३०) उद्घाटन झाले. व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे, मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. अजय मिसर, जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. डोके आदी उपस्थित होते. यावेळी सूर्यकांत शिंदे यांनी नागरिकांना या मेळाव्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे शासकीय सेवा व योजना आणि शासकीय योजनांच्या महा मेळाव्यात जिल्हाभरातील नागरिकांनी विविध शासकीय योजनांविषयी माहिती करून घेतली. दरम्यान, सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या महा मेळाव्यात विविध लाभार्थींना शासकीय योजनांची माहिती व माहितीपत्रांचे संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी वाटप केले. शासकीय योजनांच्या या मेळाव्यात नाशिक महानगरपालिका वैद्यकीय विभागातर्फे विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी जननी सुरक्षा योजनाअंतर्गत लाभार्थी लता पगारे यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के यांच्या हस्ते प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. या मेळाव्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे सावित्रीबाई फुले कल्याण योजने अंतर्गत प्रिया अढांगळे यांना लाभ देण्यात आला. तसेच जलसंपदा विभागामार्फत नागरिकांना महाराष्ट्र लोक सेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत विविध दहा सेवांची माहिती देण्यात आली.विविध विभागांचे ३० स्टॉल्समहामेळाव्यात एकूण ३० स्टॉल्स उभारले आहेत. त्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक, महावितरण, नाशिक महानगरपालिका, पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर, पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण, महिला व बाल विकास अधिकारी नाशिक, अदिवासी विकास आयुक्तालय नाशिक, महिला सुरक्षा विशेष शाखा, जिल्हा व पशु संवर्धन आयुक्तालय नाशिक, वनविभाग नाशिक, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक, जिल्हा व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालय नाशिक, जलसंपदा विभाग नाशिक, पोस्ट आॅफिस नाशिक, कामगार आयुक्त कार्यालय नाशिक, भूमी अभिलेख कार्यालय नाशिक, पाटबंधारे विभाग नाशिक, महिला आर्थिक विकास महामंडळ नाशिक, या कार्यालयांनी भाग नोंदवला.