शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्रीने सोडले़़़परिचारिकांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:45 IST

नाशिक : समाजात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असा समज आहे़; मात्र एक नव्हे तर तब्बल वंशाला दोन दिवे मिळाले तरीही अवघे दीड किलो वजन असलेली ही बालके जगतीलच याची आई-वडिलांना खात्री नव्हती़ त्यामुळे पाच दिवसांनंतर मुलांची आशा सोडून ती गुपचूप आपल्या घरी निघून गेली़ जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील डॉक्टर व परिचारिकांनी या मुलांचे पालकत्व घेऊन पन्नास दिवस सांभाळत त्यांना जीवदान दिले असून, त्या मातेचा शोध घेत बुधवारी तिच्याकडे बालके सुपूर्द करण्यात आली.

विजय मोरे ।नाशिक : समाजात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असा समज आहे़; मात्र एक नव्हे तर तब्बल वंशाला दोन दिवे मिळाले तरीही अवघे दीड किलो वजन असलेली ही बालके जगतीलच याची आई-वडिलांना खात्री नव्हती़ त्यामुळे पाच दिवसांनंतर मुलांची आशा सोडून ती गुपचूप आपल्या घरी निघून गेली़ जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील डॉक्टर व परिचारिकांनी या मुलांचे पालकत्व घेऊन पन्नास दिवस सांभाळत त्यांना जीवदान दिले असून, त्या मातेचा शोध घेत बुधवारी तिच्याकडे बालके सुपूर्द करण्यात आली.जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू (नवजात अर्भक कक्ष) विभाग अर्भक मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आला असताना या विभागातील कर्मचाºयांनी जुळ्यांना दिलेले जीवदान ही प्रशंसनीय बाब ठरली आहे़ त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यातील संगीता किसन धोंड या महिलेने पन्नास दिवसांपूर्वी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला़ अर्थात यासाठी डॉक्टरांना तिचे सिझर करावे लागले़ त्यात दुर्दैव म्हणजे जन्माला आलेल्या दोन मुलांपैकी एक मूल हे १ किलो ४०० ग्रॅम, तर दुसरे १ किलो ५०० ग्रॅम होते़ आईने मुलांची प्रकृती सुधारेल या आशेवर पाच दिवस रुग्णालयात काढले मात्र शेवटी आशा सोडून ती आपल्या स्वगृही परतली़जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू विभागातील डॉ़ डी़ पी़ गाजरे, डॉ़ के. पवार, डॉ़ बागुल, डॉ़ ठाकूर, डॉ़ ठोंबरे, परिचारिका व्ही़ वामोरकर, बी़ पाटील, कटाळे, गावित, नागमोडे, पाटील, शेवाळे, आऱ घुले, कासोटे, घोडेस्वार, शिंदे, शहा यांनी या मरणाच्या दारातील जुळ्या मुलांची ५० दिवस अहोरात्र काळजी घेऊन त्यांना जीवदान दिले़ विशेष म्हणजे मुलांना सोडून गेलेल्या या मातेचा शोध पोलिसांनी आपल्या पातळीवर खूप घेतला मात्र त्यांना अपयश आले़ अखेर पन्नास दिवसांनंतर या मातेचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळाले़पोलिसांनी या मातेला शोधून बुधवारी जिल्हा रुग्णालयात आणले़ या ठिकाणी आपली दोन्ही मुले जिवंत व गुटगुटीत असल्याचे पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला़ मुलांना जीवनदान देणारे जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू विभागातील डॉक्टर, परिचारिका व पोलिसांचे आभार मानून तिच्या दोन्ही पिलांना कवेत घेऊन ती आपल्या घरी गेली़ या मातेला तिची मुले देताना परिचारिकांनाही भरूनआले होते़