पांडाणे : सप्तशृंगी देवी ही भाविकांना कुठल्याही प्रकारची इजा पोहोचू देऊ शकत नाही, असाच अनुभव औरंगाबाद जिल्ह्यातील भाविकांना आला. गंगापूर येथील लासूरनाका येथील भवर राम मोगल, गणेश पवार हे साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येत असताना त्यांच्या इंडिका कार (एमएच २० सीएस २५४५) दरेगाव फाट्याजवळ वळणावर ताबा सुटल्याने १५ ते २० फूट अंतर रस्तासोडून खड्ड्यात पलटी झाली. गाडीत असलेल्या सुभाष भवर, राम मोगल व गणेश पवार यांनी भगवतीचा धावा सुरू केला. गाडी खड्ड्यात थांबल्यानंतर सुभाष भवर याने गाडीचा दरवाजा उघडून सर्वांना बाहेर निघल्याचे सांगितले. गाडीत भाविक रात्रीच्या वेळी देवीचे नामघोष करीत बाहेर आले. त्यांना किरकोळ मार लागल्याचे सुभाष भवरने सांगितले. आमचे दैवबलवत्तर म्हणून भगवतीने आम्हाला तारले असे भवर म्हणाले.
दैवबलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
By admin | Updated: October 3, 2014 23:15 IST