शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सुरगाण्यात आदिवासींचा मोर्चा

By admin | Updated: August 4, 2014 00:50 IST

सुरगाण्यात आदिवासींचा मोर्चा

 

सुरगाणा : आदिवासी जमातीच्या आरक्षणात धनगर जातीचा समावेश करू नये यासाठी आदिवासी समाज बचाव कृती समितीतर्फे तहसील कार्यालयावर आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो समाजबांधव, विद्यार्थी, आदिवासी सामाजिक संघटना, आदिवासी कर्मचारी संघटना, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चासाठी सर्वच आदिवासीबांधव मोठ्या संख्येने पोलीस परेड मैदानावर एकत्र जमले. घोषणा देत, हातात फलक घेत हा मोर्चा बसस्थानक, तेलीगल्ली मार्गे तहसील कार्यालयात पोहचला. या मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयाच्या आवारात सभेत झाले. यावेळी माजी आमदार जिवा गावित, हेमंत वाघेरे, भिका राठोड, सुभाष चौधरी, उर्मिला गावित, सावळीराम पवार, रंजित गावित, समीर चव्हाण, पी. के. चव्हाण, आर. डी. भोये, जयराम गावित, राम चौरे, राजेश गावित, पंकज ठाकरे, तुळशिराम खोटरे, ज्ञानदेव पवार, आर. एच. गांगुर्डे, विद्यार्थी प्रतिनिधी परशराम बिरारी, माधुरी गवळी, डॉ. हिरामण गावित, धमेंद्र पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. या आरक्षण बचाव कृती समितीमध्ये आदिवासी कर्मचारी संघटना, विश्वास फ्रेंड सर्कल, हिंदुस्थानी कला व क्रीडा प्रसारक मंडळ सुरगाणा, युवा फेरडरेशन, स्टुडंट फेडरेशन शाखा सुरगाणा, आदिवासी हक्क संरक्षण समितीसह विविध आदिवासी संघटना सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात हिरामण गावित, वसंत बागुल, भाजपाचे तालुका अध्यक्ष सुरेश गवळी, मनसेचे तालुका अध्यक्ष मनोहर खंबायत, जयराम गावित, काशीनाथ गायकवाड, वसंत राठोड, गंगाराम गावित, राष्ट्रवादीचे सरचिटणीस भास्कर चौधरी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी एस. के. चौधरी, पांडुरंग पवार, प्रभाकर महाले, नामदेव चौधरी, सुधाकर भोयेसह सुमारे पाच हजारपेक्षा जास्त आदिवासीबांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार रशिद तडवी यांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चाचा अध्यक्षस्थानी उपसभापती इंद्रजित गावित होते, तर सूत्रसंचालन रतन चौधरी यांनी केले. (वार्ताहर)