शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वीजतारा भूमिगत करण्यासाठी सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:16 IST

शहरात नागपूरच्या धर्तीवर वीजतारा भूमिगत करण्याचा प्रस्ताव महावितरणने महापालिकेला दिल्यानंतर येत्या सोमवारपासून (दि. १४) संयुक्तरीत्या सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. शहरात २५ किमी ओव्हरहेड तारा भूमिगत करण्याचे, तर ६१ किमी नवीन वीजतारा भूमिगत करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महावितरणकडून २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

नाशिक : शहरात नागपूरच्या धर्तीवर वीजतारा भूमिगत करण्याचा प्रस्ताव महावितरणने महापालिकेला दिल्यानंतर येत्या सोमवारपासून(दि. १४) संयुक्तरीत्या सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. शहरात २५ किमी ओव्हरहेड तारा भूमिगत करण्याचे, तर ६१ किमी नवीन वीजतारा भूमिगत करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महावितरणकडून २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये नाशिक दौऱ्यात महावितरणमार्फत ओव्हरहेड वाहिन्या भूमिगत करण्यासंबंधीचे आश्वासन महापालिकेच्या पदाधिकाºयांना दिले होते. त्यानुसार, तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण व महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थितीत महावितरणच्या अधिकाºयांसमवेत बैठकही झाली होती. त्यावेळी विद्युततारा भूमिगत करण्याचे काम करताना रस्ते खोदणे, केबल टाकणे, रस्ते पुन्हा दुरुस्त करणे आदी सर्वच कामे महावितरणच करणार असल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय, शहरात कोणत्या भागात विद्युततारा भूमिगत करायच्या आहेत याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल महावितरणनेच करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनंतर या कामाला आता चालना मिळणार असून, महावितरणच्या अधिकाºयांनी शुक्रवारी महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे यांच्याशी चर्चा करून संयुक्तरीत्या सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, येत्या सोमवारपासून ज्या भागात भूमिगत वाहिन्या टाकायच्या त्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. एकात्मिक ऊर्जा सक्षमीकरणांतर्गत नाशिक जिल्ह्याला वीजतारा  भूमिगत करण्यासाठी ८७ कोटी रुपये मंजूर झालेले असून, त्यातील २० कोटी रुपये नाशिक शहरात खर्च केले जाणार आहेत. त्यात २५ कि.मी. मार्गावरील ओव्हरहेड वीजतारा भूमिगत केल्या जाणार असून, ६१ कि.मी. मार्गावर नव्याने वीजतारा भूमिगत करण्याचे प्रस्तावित आहे.जबाबदारी कोण घेणार?शहरात विद्युततारा भूमिगत करताना महापालिकेची पाण्याची पाइपलाइन, ड्रेनेजलाइन याबाबत काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारीही महावितरणने घ्यावी, अशी सूचना महापौर रंजना भानसी यांनी यापूर्वीच महावितरणला केली आहे. त्यानुसार महासभेचा ठराव करून दिला जाणार असल्याचेही महापौरांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. आता महावितरणमार्फत सदर प्रस्तावित कामांना चालना दिली जाणार असल्याने रस्ते फोडण्यापासून ते त्याच्या दुरुस्तीपर्यंतची जबाबदारी कोण घेणार, याबाबतची निश्चिती करावी लागणार आहे.

टॅग्स :electricityवीज