शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

फळपीक विम्याच्या लाभापासून कळवण, सुरगाणा तालुका वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST

या विमा योजनेत कळवण व सुरगाणा तालुक्यांतील सर्व गावांचा समावेश चालू आर्थिक वर्षातच करावा, अशी मागणी करण्यात आली आहे; ...

या विमा योजनेत कळवण व सुरगाणा तालुक्यांतील सर्व गावांचा समावेश चालू आर्थिक वर्षातच करावा, अशी मागणी करण्यात आली आहे; अन्यथा कळवण तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभोणा पश्चिम आदिवासी विकास समिती, तसेच तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी बांधवांनी दिला आहे. स्ट्रॉबेरी या फळपिकासाठी महाराष्ट्र शासनाने प्रायोगिकतत्त्वावर समाविष्ट केलेल्या गावांमध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, तपोळा, लामज आणि पंचगणी वगळता राज्यभरातील इतर एकही स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या गावांचा समावेश विमा योजनेत करण्यात आलेला नाही, स्ट्रॉबेरी फळ लागवडीत कळवण तालुक्यात सुमारे ४०० हेक्टर इतकी लागवड दरवर्षी केली जाते. सोबतच सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा आणि दिंडोरी तालुक्यातदेखील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते, महाबळेश्वरच्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात आदिवासी तालुक्यात स्ट्रॉबेरी पीक घेतले जाते.

गेल्या दहा वर्षांपासून कळवण, सुरगाणा व दिंडोरी येथील कमी- अधिक प्रमाणात अंदाजे ५० गावे स्ट्रॉबेरी फळाची लागवड करीत आहेत. या लागवडीसाठी मल्चिंग पेपर, ड्रिपिंग, अशा विविध योजना तालुका कृषी विभागाने स्ट्रॉबेरी उत्पादकांना याआधी देऊ केल्या आहेत. असे असतानादेखील शासनाने पारित केलेल्या १८ जूनच्या फळपीक विमा योजनेच्या अध्यादेशामध्ये कळवणसह इतर तालुक्यांतील आदिवासी शेतकरी विमा योजनेपासून वंचित होताना दिसत असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कळवणसह इतर तालुक्यांतील स्ट्रॉबेरी उत्पादकांची हेक्टरी माहिती कृषी मंत्रालयाला कळवून विमा योजनेत सर्व गावांचा समावेश चालू आर्थिक वर्षातच करावा; अन्यथा कळवण तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन व निषेध नोंदविण्यात येईल, असा इशारा अभोणा पश्चिम आदिवासी विकास समिती, तसेच तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरीबांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. तालुका कृषी विभाग व कळवण तहसील विभागाला याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रकाश बागूल, समिती मार्गदर्शक चेतन हिरे, उपाध्यक्ष भरत चव्हाण, कार्यकारी सदस्य उत्तम चव्हाण, दीपक दळवी, होनाजी चव्हाण, शिवराम पालवी, रमेश गावित, शांताराम बागूल, विनोद चव्हाण, अमित बोरसे, मुकेश गावित, एकनाथ बागूल आदींसह स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी देवराम पवार, नंदू गायकवाड, विकास कवर, यशवंत गवळी, चिंतामण पवार, सुरेश दळवी, पांडुरंग गायकवाड, साहेबराव गायकवाड, पार्वताबाई दळवी, अंबादास चव्हाण, अमृता चव्हाण, सुनील ठाकरे, सावळीराम चव्हाण, बंडू चव्हाण, एकनाथ पालवी, हिरामण पालवी, केशव गावित, पुंडलिक चव्हाण यांच्यासह सुकापूर, देवळीकराड, आमदार, वाडपाडा, लिंगामे व देवळीवणी येथील आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.