व्यासपीठावर भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अधिकारी जयवंत बोडके, वडझिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. फरताळे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी संदीप कापडी, विद्यार्थी विकास अधिकारी किरण सोनवणे उपस्थित होते. बोडके २३ वर्षांपासून आर्मीत कार्यरत आहेत. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक दिवसानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सर्जिकल स्ट्राईक हे देशाच्या सार्वभौमत्वासाठी व सैन्यदलासाठी प्रोत्साहन असल्याचे मत व्यक्त केले. १८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीर भागात आतंकवादी भ्याड हल्ला झाला होता, त्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने २९ सप्टेंबर २०१६ रोजी सर्जिकल स्ट्राईक केले होते यासह सैन्यभरती प्रक्रियेबद्दलची माहिती बोडके यांनी दिली. प्राचार्य फरताळे यांनी भारतीय सैन्याबद्दल अभिमान व्यक्त केला. याप्रसंगी सुजित हंडोर, वृषाली उगले, संदीप पगार, अर्चना सावंत, गोरक्षनाथ पगार व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुजाता डावखर यांनी सूत्रसंचालन तर ललित गांगुर्डे यांनी आभार मानले.
बारागाव पिंप्री महाविद्यालयात सर्जिकल स्ट्राईक डे साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:47 IST