शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दोडी रुग्णालयात शस्त्रक्रिया क्षमता तीनपट वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी नांदूरशिंगोटे : दोडी ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागाचा विस्तार करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया क्षमता ...

जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी

नांदूरशिंगोटे : दोडी ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागाचा विस्तार करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया क्षमता तीनपट वाढणार असून, या कामाची पाहणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केली. दरम्यान, शस्त्रक्रियांची व्याप्ती वाढणार असल्याने त्याचा परिसरातील ३० पेक्षा अधिक गावांना फायदा होणार आहे.

परिसर सुधारणा करण्यासह शस्त्रक्रिया विभागाची सज्जता वाढवावी यासाठी काही दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली होती. तसेच दोन कोटी रुपयांचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. तेव्हापासून ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियांची व्याप्ती वाढवण्यासह विविध सुधारणा करण्याची मागणी जोर पकडू लागली. रुग्ण व परिसरातील गावांतील मागणी वाढू लागल्याने निधी उपलब्ध झाला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व लक्ष्य मोहिमेंतर्गत शस्त्रक्रिया विभागाचा विस्तार वाढवण्यात येत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे यांनी या कामाची पाहणी केली. शस्त्रक्रिया विभागाच्या इमारतीचे नव्याने सुरू असलेले काम, त्याचा दर्जा, शस्त्रक्रिया विभागासाठी बांधकामात अत्यावश्यक असलेल्या बाबींची थोरात यांनी पाहणी केली. तीन महिन्यांपासून सुरू असलेली लसीकरण मोहीम कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या अ‍ॅंटिजन टेस्ट याचा डॉ. थोरात यांनी आढावा घेतला. कामाबाबत समाधान व्यक्त केले.

विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) मिळालेली रुग्णवाहिका व इतर साहित्याची माहिती डॉ. थोरात यांनी घेतली. अधीक्षक डॉ. शरद पाटील, डॉ. वीरेंद्र सिंग, डॉ. गिरीश भालेराव, डॉ. सुशील पवार, विजय पाटील यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

-------------------

नवीन शस्त्रक्रिया विभागातील सुविधा

रुग्णालयात एका वेळी एकच प्रसूती शस्त्रक्रिया व अन्य रुग्णांवरील केवळ एक शस्त्रक्रिया करण्याची सुविधा होती. आता नवीन शस्त्रक्रिया विभागात विविध आजारांवरील एकाचवेळी तीन रुग्णांवर शस्त्रक्रिया होऊ शकतील. तर एका वेळी तीन प्रसूती शस्त्रक्रियाही होऊ शकतील. प्रसूती शस्त्रक्रियेसाठी वेगळी, तर अन्य शस्त्रक्रियांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

---------------------

दोडी ग्रामीण रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया विभागाच्या विस्तार कामाची पाहणी करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात. समवेत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, अधीक्षक डॉ. शरद पाटील, डॉ. वीरेंद्र सिंग आदींसह कर्मचारी. (०८ दोडी)

080721\08nsk_28_08072021_13.jpg

०८ दोडी