शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा येथील प्रकार : जादूटोण्याच्या संशयावरून त्रास दिल्याची पोलिसांत तक्रार गावकीने बहिष्कृत केलेल्या वृद्धाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:27 IST

हातावर पोट असलेल्या आणि ‘त्याच्याकडे देव आहेत आणि तोे गुरेढोरे मारतो,’ अशा समजुतीने केलेल्या छळवणुकीमुळे गावकीच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या पांडू धर्मा चौधरी (वय ७७) या वृद्धाने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भातील तक्रार अर्ज त्याचे नातू असलेल्या देवीदास चौधरी यांनी पोलीस ठाण्यात केला आहे.

नाशिक : हातावर पोट असलेल्या आणि ‘त्याच्याकडे देव आहेत आणि तोे गुरेढोरे मारतो,’ अशा समजुतीने केलेल्या छळवणुकीमुळे गावकीच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या पांडू धर्मा चौधरी (वय ७७) या वृद्धाने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भातील तक्रार अर्ज त्याचे नातू असलेल्या देवीदास चौधरी यांनी पोलीस ठाण्यात केला आहे.राज्यात जादूटोणा आणि सामाजिक बहिष्काराविरोधात कायदा होऊनही अशा घटना टळत नसल्याचे या प्रकाराने पुढे आले आहे. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.सुरगाणा तालुक्यातील धामणकुंड येथे हा प्रकार घडला. पांडू चौधरी यांच्यासह कुटुंबीयांचा शेती व्यवसाय आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गावातील दुर्घटनांना कारणीभूत ठरवून चौधरी यांना त्रास दिला जात होता. त्यांच्याकडे देव असल्याने गावात माणसे आणि जनावरांचे अकाली मृत्यू होत असल्याचे गावातील काहींचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांना त्रास दिला जात असल्याने दोन महिन्यांपूर्वी ते अन्यत्र (धूरपाडा) वास्तव्यास गेले होते. मात्र गावदेवाच्या पूजेच्या निमित्ताने त्यांना गावात पुन्हा बोलावण्यात आले. त्यातच गावात एक रेडा मृत्युमुखी पडला आणि त्यापोटी पुन्हा या कुटुंबीयांना त्रास दिला गेल्यानेच त्यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी देवीदास चौधरी यांची तक्रार आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यवाह महेंद्र दातरंगे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार सुरगाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक कानडे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचेही दातरंगे यांनी सांगितले. दरम्यान, सुरगाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पांडू चौधरी यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी त्यांचे केवळ कुटुंबीय उपस्थित होते.