शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

सटाण्यात विविध संघटनांचा पाठिंबा

By admin | Updated: September 23, 2016 01:00 IST

बैठक : डॉक्टर, वकील, शेतकरी संघटनेचा पाठिंबा जाहीर

सटाणा : मराठा क्र ांती मूक मोर्चाला शहरातील मुस्लीम समाज व तेली समाजाबरोबरच डॉक्टर असोसिएशन, वकील संघाने एकमुखी पाठिंबा जाहीर केला. शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी झालेल्या मेळाव्यात हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.आज गुरूवारी सटाणा वकील संघाच्या हॉलमध्ये रामचंद्रबापू पाटील, काका रौंदळ, ज. ल. पाटील, अरविंद सोनवणे यांनी वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे, वसंतराव सोनवणे, नितीन चंद्रात्रे, सतीश चिंधडे, मधुकर सावंत यांची भेट घेऊन संघाच्या सदस्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी वकील संघाच्या सदस्यांनी मोर्चात सहभागी होऊन एकमुखी पाठिंबा जाहीर केला. तसेच डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकारी डॉ.विलास बच्छाव, डॉ. मनोहर सोनवणे, डॉ.प्रकाश जगताप, डॉ. दिग्विजय शहा, डॉ. अतुल जाधव, कुलदीप जाधव, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. अमोल पवार, डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. श्यामकांत जाधव, जयवंत महाले, शशिकांत कापडणीस यांनी बैठक घेऊन पाठिंबा दिला .मराठा क्र ांती मोर्चास सटाणा शहरातील मुस्लरम बांधवांनी पाठिंबा दिला असून, याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. राज्यातील मराठा समाज पहिल्यांदा आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला असून, मराठा समाजाच्या सर्व मागण्या रास्त असल्याचे मुस्लीम बांधवांनी म्हटले आहे. राज्य शासनाने न्यायालयासमोर मराठा समाजाची बाजू मांडून लवकरच मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.कोपर्डी येथील पीडित भगिनीला न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आदि मागण्यांसाठी नाशिक येथे लाखोंच्या उपस्थितीत मराठा क्र ांती मोर्चा संपन्न होत असून, राज्य शासनाला निश्चित याची दखल घ्यावी लागेल. आम्ही सर्व मुस्लीम समाजबांधवांनी मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाला सशर्त पाठिंबा देत आहोत, असे पत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे. तसेच सटाणा तेली समाजाचे दत्तात्रेय सोमनाथ पवार, अरुण सोनवणे, सुनील जाधव, तुषार गाडेकर, हेमंत नेरकर, राजेंद्र वाघ, तुषार सूर्यवंशी, शशिकांत बिरारी, विश्वनाथ जाधव, राजाराम जाधव, केशव जाधव आदि पदाधिकाऱ्यांनी मराठा मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा जाहीर केला आहे. शहरातील स्वामी समर्थ मंदिरात नववसाहत भागातील नागरिकांनी बैठक बोलावून सर्वच समाजबांधवांनी मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील, अरविंद सोनवणे, लालचंद सोनवणे, मनोहर देवरे, किशोर भामरे, पांडुनाना सोनवणे, जे. टी. सूर्यवंशी, सचिन भामरे, दीपक रौंदळ, अमर रौंदळ, संग्राम भामरे, भावेश भामरे, पिंटू बागुल, धीरज बागुल, राहुल पाटील, पिंटू सूर्यवंशी, डॉ. मनीष सूर्यवंशी, जीवन ठाकरे, बबलू रौंदळ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)