शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हरअभावी आधार जोडणी ठप्प रेशनदुकानदारांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 18:05 IST

खमताणे : रेशनचे धान्य बायोमेट्रिक पध्दतीने वाटपासाठी रेशनकार्डधारकांकडुन आधार लिकिंग करण्याचे काम गतीने सुरू असताना सर्व्हर डानमुळे हे काम थंडावले आहे. त्यामुळे नवीन अर्जाची डाटा एंट्री ठप्प झाली आहे. तसेच धान्य वितरणाची प्रकिया आॅनलाईन असल्याने अनेक लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.

ठळक मुद्देलाभार्थी धान्यापासून वंचित

खमताणे : रेशनचे धान्य बायोमेट्रिक पध्दतीने वाटपासाठी रेशनकार्डधारकांकडुन आधार लिकिंग करण्याचे काम गतीने सुरू असताना सर्व्हर डानमुळे हे काम थंडावले आहे. त्यामुळे नवीन अर्जाची डाटा एंट्री ठप्प झाली आहे. तसेच धान्य वितरणाची प्रकिया आॅनलाईन असल्याने अनेक लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत गरीब कुटुंबांना रेशनवर सवलतीच्या कुटुंबाना रेशनवर सवलतीच्या दरात धान्य देण्यात येत आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीत रेशिनंगचे कॉम्युटरायझेशन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेशनवरील धान्य वाटपाचे संपूर्ण कम्प्युटरायंझेशन करण्यासाठी राज्य सरकारने पावले टाकली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेशन धान्य वितरणासाठी बायोमेट्रिक पध्दत अवलंबण्यात येत आहे. बायोमेट्रिक धान्य वाटपामुळे धान्याची वीस टक्के गळती कमी होण्यास मदत होणार आहे. रेशनकार्ड धारक लाभार्थ्यांना बायोमेट्रिक ओळख पडल्यानंतर धान्य वितरित होणार आहे. बोगस शिधा पत्रिकाधारकांना आळा घालण्यासाठी प्रत्येक सदस्याचे आधार लिकिंग करण्यात येत आहे. मात्र नाव लिकिंग करता शासनाची आर सी एम एस म्हणजेच रेशनकार्ड मॅनेजमेंट सिस्टीम हे संकेतस्थळ सध्या सर्व्हर अभावी बंद आहे. त्यामुळे शिधा पत्रिकाधारकाचे नाव समाविष्ट करणे ही कामे ठप्प आहेत.लाभार्थी धान्यापासून वंचितशिधा पत्रिकाधारकांना धान्य देताना त्याचा अंगठ्याचा ठसा धान्य वितरित केले जाते. याकरता त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड ची लिंक करण्यात आले आहे. मात्र सर्व्हर ठप्प असल्याने लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. मात्र ही सर्व प्रकिया आॅनलाईन असल्याने रेशन दुकानदारांनीही हतबलता व्यक्त केली आहे.गत चार ते पाच दिवसांपासून सर्व्हरच्या समस्येमुळे आॅनलाईन डाटा एंट्रीचे काम ठप्प झाले आहे. ही समस्या संपूर्ण राज्यात आहे.- श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पुरवठा अधिकारी.रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू केला. परंतु वारंवार सर्व्हर ठप्प होत असल्याने त्याचा सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागत आहे.- वैभव बागुल, खमताणे. (फोटो ०४ बायोमेट्रीक)