शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी आधार कार्ड सक्तीचे

By admin | Updated: June 27, 2017 01:22 IST

नाशिक : वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्याबाबत न्यायालयात वाद सुरू असताना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्याबाबत न्यायालयात वाद सुरू असताना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी ज्या बॅँक खात्याशी आधार कार्ड जोडले असेल त्याच बॅँकेचा खाते क्रमांक त्यासाठी देणे बंधनकारक आहे.  केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांसाठी खरीप हंगामासाठी पीकविमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या विमा योजनेत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसानभरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसानभरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक, नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना पीक संरक्षण मिळणार आहे. या योजनेंतर्गत भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३९ हजार रुपये प्रतिहेक्टर असून, शेतकऱ्यांनी त्यासाठी ७८० रुपये पीक विम्याचा हप्ता भरावयाचा आहे. खरीप ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम २४ हजार रुपये तर त्यासाठी ४८० रुपये विमा हप्ता, बाजरी कारळे आणि नाचणीसाठी २० हजार रुपये आणि विमा हप्ता ४०० रुपये आहे. मक्यासाठी २५ हजार रुपये आणि विमा हप्ता ५०० रुपये, मूग आणि उडीदसाठी १८ हजार रुपये तर विमा हप्ता ३६० रुपये, भुईमूगसाठी ३० हजार रुपये विमा हप्ता ६०० रुपये, सोयाबीनसाठी ४० हजार रुपये तर विमा हप्ता ८०० रुपये, कापूस ४० हजार रुपये तर विमा हप्ता दोन हजार तसेच कांदा पिकासाठी ५५ हजार रुपये प्रतिहेक्टर २७५० रुपये विमा हप्ता आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी छायाचित्र, बॅँक खातेपुस्तकाची प्रत आणि आधार कार्डाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक असून, आधार कार्ड नसल्यास आधार कार्ड नोंदणी पावतीसह ओळखपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.