शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा परवेज कोकणी यांना पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:01 IST

नाशिक : लोकसभेच्या पालघर येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेने श्रीनिवास वणगा यांची उमेदवारी कायम ठेवण्याबरोबरच पलूस विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे विश्वजित कदम यांना एकतर्फी पाठिंबा घोषित करून भारतीय जनता पक्षाच्या केलेल्या राजकीय कोंडीचा हिशेब चुकता करण्यासाठी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार परवेज कोकणी यांना भाजपाने पाठिंबा देण्याचा ...

ठळक मुद्देपालकमंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत चर्चा भाजपालाही निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली

नाशिक : लोकसभेच्या पालघर येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेने श्रीनिवास वणगा यांची उमेदवारी कायम ठेवण्याबरोबरच पलूस विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे विश्वजित कदम यांना एकतर्फी पाठिंबा घोषित करून भारतीय जनता पक्षाच्या केलेल्या राजकीय कोंडीचा हिशेब चुकता करण्यासाठी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार परवेज कोकणी यांना भाजपाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त असून, त्यासाठी उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुप्त खलबते सुरू होती.नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघात गेल्या आठ दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेऊन शिवसेनेच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. नाशिक भेटीवर येऊन गेलेले प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील त्यावर भाष्य करण्याऐवजी शिवसेनेलाच युतीधर्म पाळण्याचे सल्ले दिले होते. भाजपाची भूमिका स्पष्ट होत नसल्यामुळे नरेंद्र दराडे व परवेज कोकणी यांना ‘कभी खुशी कभी गम’चा अनुभव घ्यावा लागत होता.मंगळवारी दुपारी भाजपाच्या जिल्ह्यातील सर्व नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांना तातडीने मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार दुपारी मिळेल त्या वाहनाने नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी मुंबईला रवाना झाले असून, मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी अगोदर पालकमंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन त्यात त्यांची मते आजमावण्यात आल्याचे सांगण्यात आले व विशेष म्हणजे या बैठकीसाठी जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार परवेज कोकणी यांनाही उपस्थित राहण्याचे निमंत्रण भाजपाने दिल्यामुळे यासंदर्भातील त्यांची भूमिका स्पष्ट दिसू लागली आहे. अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोकणी यांच्या नामांकन अर्जावर भाजपा नगरसेवकांनी सूचक म्हणून केलेल्या स्वाक्षऱ्या व पक्षाच्या पदाधिकाºयांनी कोकणी यांच्या प्रचारात घेतलेला सहभाग पाहता त्यांच्या उमेदवारीला भाजपाचा छुपा पाठिंबा असल्याचे मानले जात होते. त्यातच शिवसेनेने पालघरमध्ये उमेदवारी कायम ठेवल्यामुळे आता भाजपालाही निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली आहे.