शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाभानगर रुग्णालयाच्या समर्थनार्थ सरसावल्या परिसरातील महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:49 IST

भाभानगर येथील गायकवाड सभागृहालगतच्या जागेत शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यास स्थानिक नागरिकांनी विरोधाचा पवित्रा घेतलेला असतानाच, आता जवळच असलेल्या भारतनगर, शिवाजीवाडी, वडाळा, बजरंगवाडी येथील महिला रुग्णालयाच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या असून, भाभानगर येथेच रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

नाशिक : भाभानगर येथील गायकवाड सभागृहालगतच्या जागेत शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यास स्थानिक नागरिकांनी विरोधाचा पवित्रा घेतलेला असतानाच, आता जवळच असलेल्या भारतनगर, शिवाजीवाडी, वडाळा, बजरंगवाडी येथील महिला रुग्णालयाच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या असून, भाभानगर येथेच रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे गिते समर्थकांपाठोपाठ आता फरांदे समर्थकांनीही आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.शंभर खाटांच्या रुग्णालयाला भाभानगर येथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवित न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाभानगर येथेच रुग्णालय झाले पाहिजे, अशी भूमिका भारतनगर, शिवाजीवाडी, वडाळा, बजरंगवाडी या स्लम भागातील महिलांनी घेतली असून, तसे निवेदन अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, भाभानगर येथे प्रस्तावित महिला रुग्णालय अन्यत्र बांधण्याचा घाट काही लोकांकडून घातला जात आहे. परंतु, परिसरात इतर असलेली रुग्णालये ही खूप महागडी असून, गोरगरीब महिला रुग्णालयांना तेथे उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. तरीही खासगी रुग्णालयांचे हितसंबंध जपण्यासाठीच महिला रुग्णालयाला विरोध केला जात असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. सदर रुग्णालय भाभानगर येथेच बांधण्यात यावे व अन्यत्र स्थलांतरित करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शमीना पिंजारी, रेश्मा खान, अलका चौहान, साजेदा सय्यद, रंजना अंबोरे, हलीमा राजेखान यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षºया आहेत.