नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत रेशन दुकानदारांना दरमहा देण्यात येणाऱ्या शिधापत्रिकेच्या तुलनेतील धान्याच्या कोट्यात तब्बल ५० टक्के कपात करण्यात आल्याने रेशन दुकानदार व पुरवठा खात्यात चांगलीच जुंपली असून, सुरगाणा येथे कोट्यवधी रुपये किमतीच्या धान्य घोटाळ्याची सारवासारव करण्यासाठीच पुरवठा खात्याने कोट्यात कपात केल्याचा दावा दुकानदारांनी केला आहे, तर माथाडी कामगारांच्या संपामुळे मोठ्या प्रमाणावर धान्य व्यपगत झाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे पुरवठा खात्याचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांपासून धान्य कपातीच्या मुद्द्यावरून झालेली ताणाताणी दुकानदारांनी थेट शासन दरबारी पोहोचविल्याने अडचणीत आलेल्या पुरवठा खात्याने आता प्रत्येक शिधापत्रिकाधारकाचा आधार क्रमांक व बॅँक खाते क्रमांक रेशन दुकानदाराने गोळा करून सादर करावे, असा उतारा शोधून दुकानदारांनाच पेचात पकडले आहे.
धान्य कपातीवरून पुरवठा खाते-दुकानदारांमध्ये जुंपली
By admin | Updated: March 6, 2015 00:10 IST