शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शहरात उच्चांकी, ३७.३ कमाल तपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:59 IST

शहराच्या हवामानात कमालीचा बदल होत असून, उन्हाची तीव्रता वाढत आहे. रविवारी (दि.२५) हंगामातील उच्चांकी ३७.३ इतक्या कमाल तपमानाची नोंद करण्यात आली. मार्चअखेर उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका जाणवत आहे.

नाशिक : शहराच्या हवामानात कमालीचा बदल होत असून, उन्हाची तीव्रता वाढत आहे. रविवारी (दि.२५) हंगामातील उच्चांकी ३७.३ इतक्या कमाल तपमानाची नोंद करण्यात आली. मार्चअखेर उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका जाणवत आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही उन्हाची तीव्रता अधिक राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी २५ मार्च रोजी ३८.४ अंश इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते. जवळपास एक अंशाने जरी तपमान रविवारी कमी राहिले असले तरी पुढील काही दिवसांत तपमान वाढण्याची दाट शक्यता आहे. रविवारी कमाल तपमान ३७ अंशांपर्यंत राहिले तरी राज्यात सर्वाधिक नीचांकी किमान तपमानाची नोंद १०.५ नाशिकमध्ये झाली. यामुळे नाशिककरांना वाढत्या उन्हासोबत पहाटे व रात्री थंड वाराही जाणवला. कमाल तपमानाचा पारा ३५ अंशांच्या जवळपास स्थिरावत होता; मात्र काही दिवसांपासून तपमानाचा पारा रविवारी पुन्हा चढता झाल्याने थेट ३७ अंशांच्या पुढे सरकला. एकूणच पुढील दोन महिन्यांत शहर कमालीचे तापणार असल्याची चिंता नाशिककरांमध्ये व्यक्त केली जात आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होऊ लागल्याने नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणात वातानुकूलित यंत्रे, पंख्यांचा वापर केला जात आहे.

टॅग्स :Temperatureतापमान