शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकच्या आधाराश्रमाची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST

त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या वाढत्या उपद्व्यापामुळे सर्वत्र हाहाकार होत असताना नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील ...

त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या वाढत्या उपद्व्यापामुळे सर्वत्र हाहाकार होत असताना नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील आधार आश्रमात जाऊन पाहणी केली.

रविवारी सुटीचा दिवस असल्याने दुपारहून साध्या वेशात जात त्र्यंबकेश्वर भागातील सुमारे तीस मुलींचे श्रीमती कारडा बाल सदन येथील डॉ. रत्नाकर पवार यांची भेट घेतली. यावेळी डॉ. पवार यांनी सचिन पाटील यांना विविध माहिती देत मुलींचे संगोपन आणि घेण्यात येणारी काळजी याबाबत विशेष माहिती दिली. त्यानंतर आधारतीर्थ आश्रम येथे सुमारे १३० मुलं आहेत. तेथील व्यवस्थापक त्र्यंबकराव गायकवाड यांच्याकडून कशाप्रकारे येथे काळजी घेतली जाते, आतापर्यंत एकही कोविडबाधित आढळून न आल्याने कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत माहिती घेतली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे उपस्थित होते.

----------------

पोलीसप्रमुख पाटील ज्यावेळी आश्रमात आले, त्यावेळी कोणताही खाकीचा रुतबा जाणवला नाही. साध्या वेशात आणि सरकारी गाडीविना त्यांनी परिसराची पाहणी केली. मुलांची घेतली जाणारी काळजी बघता त्यांनी संस्थाचालकांचे विशेष कौतुक केले.

------------------

कोविडची परिस्थिती पाहता प्रत्येकाला त्यांच्या कुटुंबांचा सांभाळ महत्त्वाचा ठरू पाहत आहे. परंतुश आधार आश्रमात राहणाऱ्या मुलांना देखील भावना आहेत. त्यामुळे अचानक भेट देत त्यांची विचारपूस केली. या ठिकाणी मुलांना कोरोनाबाबत सूचित केलेली नियमावली तंतोतंत पाळताना दिसली, असेच आदर्श सर्वांनी कुटुंब म्हणून घ्यावे.

-सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक.

-------------

फोटो: त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात चर्चा करताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील व इतर. (११ ओझर)

===Photopath===

110521\11nsk_7_11052021_13.jpg

===Caption===

११ओझर