कळवण : दि कळवण मर्चण्ट को-ऑप. बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बँकेच्या कार्पोरेट सभागृहात संपन्न होऊन बँकेच्या अध्यक्षपदी सुनील महाजन, उपाध्यक्षपदी नितीन वालखडे तर जनसंपर्क संचालकपदी राजेंद्र अमृतकार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.दि कळवण मर्चण्ट को-ऑप. बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. धर्मराज मुर्तडक, उपाध्यक्ष पोपटराव बहिरम यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची नव्याने निवड करण्यात आली. सहकार विभागाने कमको बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याने संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक के.डी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी महाजन यांना राजेंद्र अमृतकार, तर उपाध्यक्षपदासाठी वालखडे यांना शालिनी महाजन सूचक होत्या. याप्रसंगी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला बँकेचे मावळते अध्यक्ष डॉ. धर्मराज मुर्तडक, पोपटराव बहिरम, योगेश मालपुरे, प्रा. निंबा कोठावदे, प्रवीण संचेती, गजानन सोनजे, प्रभाकर विसावे, भारती कोठावदे, शालिनी महाजन उपस्थित होते.
‘कमकोे’ अध्यक्षपदी सुनील महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:53 IST