शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाबाज थिएटरतर्फे रविवार ह्रदयनाथ मंगेशकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:10 IST

नाशिक- नामवंत संगीतकार तथा भावगंधर्व म्हणून ओळखले जाणारे पं. ह्दयनाथ मंगेशकर व सांस्कृतिक, सामाजिक चळवळीत योगदान देणारे सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे या दोघांचा बाबज थिएटर व ग्लोबल व्हीजन इंटरनॅशनल स्कूल यांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. दोघांनी वयाची ८० वर्षे पुर्ण केली आहेत. त्याचे औचित्य साधून रविवारी (दि.१९) सायंकाळी ...

नाशिक- नामवंत संगीतकार तथा भावगंधर्व म्हणून ओळखले जाणारे पं. ह्दयनाथ मंगेशकर व सांस्कृतिक, सामाजिक चळवळीत योगदान देणारे सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे या दोघांचा बाबज थिएटर व ग्लोबल व्हीजन इंटरनॅशनल स्कूल यांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. दोघांनी वयाची ८० वर्षे पुर्ण केली आहेत. त्याचे औचित्य साधून रविवारी (दि.१९) सायंकाळी साडेसहाला कुसुमाग्रज स्मारकात हा कार्यक्रम होईल.पद्मश्री पं. ह्रदयनाथ मंगेशकर मराठी माणसाच्या ह्रदयापर्यंत पोहोचले ते त्यांच्या अतिशय सुंदर भावपूर्ण गाण्यांमुळे. चित्रपट संगीत असो, भावसंगीत असो, गझल असो किंवा शास्त्रीय बंदिशी असो,संगीताच्या या प्रत्येक प्रकाराला अत्युच पातळीवर घेऊन जाऊन संगीताची उंची वाढविण्याचे अवघड काम त्यांनी सोप्या पद्धतीने केले. गीतकार, गायक, नट, दिग्दर्शक अशा भूमिका करणाºया सर्वच व्यक्तीमत्वांना त्यांच्या संगीताने पुढे आणलेले आहे. संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी नाविन्यपुर्ण प्रयोग केले आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या रचना त्यांच्या संगीतामुळेच जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या. याच कार्यक्रमात सांस्कृतिक व सामाजिक चळवळीतील मार्गदर्शक मधुकर झेंडे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. शहराचा बदलता इतिहास झेंडे यांना मुखोद्गत आहे. नाशिकच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. आजही ते अनेक संस्था, युवक, नागरिक यांना मार्गदर्शन करतात, सक्रीय सहभाग देतात.धार्मिक शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात झेंडे यांचे दिर्घकालीन योगदान आहे. त्यामुळे या दोघा व्यक्तीमत्वांच्या सत्कार समारंभास मोठ्या संख्येने नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.