शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रविवार कारंजा मित्रमंडळाची रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:30 IST

साधारणत: ९९ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाला सुरुवात करणाºया रविवार कारंजा येथील रविवार कारंजा गणेश मित्रमंडळाचे शतकपूर्ती वर्ष सुरू झाले आहे. वेगवेगळ्या देखाव्यांसाठी प्रख्यात असलेल्या या मंडळाने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून खºया अर्थाने लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे.

नाशिक : साधारणत: ९९ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाला सुरुवात करणाºया रविवार कारंजा येथील रविवार कारंजा गणेश मित्रमंडळाचे शतकपूर्ती वर्ष सुरू झाले आहे. वेगवेगळ्या देखाव्यांसाठी प्रख्यात असलेल्या या मंडळाने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून खºया अर्थाने लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे. ९९ वर्षांपूर्वी गंगाप्रसाद पन्नालाल हलवाई यांनी रविवार कारंजा येथे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा सुरू आहे. गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सामाजिक भान जपणाºया या मंडळाने वास्तवातही वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची धडाडी कायम ठेवली आहे. या मित्रमंडळाचा धमार्थ दवाखाना वर्षभर सुरू असतो. दिवसाकाठी शंभरहून अधिक रुग्ण या धमार्थ दवाखान्यात उपचार करतात. तसेच दुर्धर शस्त्रक्रियेसाठी या मंडळाने स्थापन केलेल्या ट्रस्टमार्फत हृदयविकार शस्त्रक्रिया (बायपास), मेंदू शस्त्रक्रिया (ब्रेनट्यूमर) आदींसह विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी चार ते पाच हजारांपर्यंत रक्कम रुग्णाच्या खात्यात जमा केली जाते. नैसर्गिक आपत्तीतही रविवार कारंजा मित्रमंडळ प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून आपतग्रस्तांना मदत करते. दोन वर्षापूर्वी गोदावरीला आलेल्या पुरामुळे गंगावाडीतील रहिवाशांना तब्बल दोन दिवस भोजन व निवासाची व्यवस्था रविवार कारंजा मित्रमंडळाने गंगावाडीतीलच बालाजी मंदिरात करून दिली. तसेच जमलेल्या वर्गणीतून व दानातूनच हे सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सांगितले.दोनशे किलोचा चांदीचा गणपती१९७८ साली रविवार कारंजा मित्रमंडळाने ११ किलो चांदीपासून गणपती बनविण्यास सुरुवात केली. साधारणत: १९८५-८६ मध्ये २०० किलोची चांदीच्या गणपतीची मूर्ती पूर्ण झाली. दोन वर्षांपूर्वी याच चांदीच्या गणपतीला एक किलो सोन्याचे अलंकार चढविण्यात आले आहेत. ही मूर्ती लोंढे बंंधूनी बनविली. त्यावर अंतिम हात बाळू संगमनेरकर यांनी फिरविला. चांदीच्या मूर्तीसाठी टकले बंधूंनी २०० किलो चांदी उपलब्ध करून दिल्यानंतर ४०० किलो चांदीतून २०० किलोची चांदीची गणेशमूर्ती साकारली आहेत.