शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा

By admin | Updated: March 6, 2017 01:25 IST

नाशिक : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तपमानाचा पारा हळूहळू चढू लागल्याने उन्हाच्या चटक्यातही हळूहळू वाढ होत उन्हाळा येऊन दाखल झाला आहे.

नाशिक : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तपमानाचा पारा हळूहळू चढू लागल्याने उन्हाच्या चटक्यातही हळूहळू वाढ होत उन्हाळा येऊन दाखल झाला आहे. तपमानातही बदल होण्यास सुरुवात झाली आहे. तप्त दुपार आणि गरम हवा शरीरावरही परिणाम करतेच. त्यामुळे उन्हाळा आल्यानंतर तुमच्या जेवणाच्या दिनचर्येतही बदल गरजेचा आहे. उन्हाळ्यात अधिक तेलकट खाणे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे संतुलित आहाराची आवश्यकता असते. दिवसाची सुरुवात एक लीटर पाणी किंवा लिंबू पाण्याने करा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिणेही आवश्यक असते. निसर्गाने प्रत्येक ऋतू भिन्नरितीने बनविला आहे. पण त्यासोबतच प्रत्येक ऋतूचे फायदेही देऊ केले आहेत. थंडीत शरीरात उष्णता उत्पन्न करणाऱ्या पालेभाज्या, फळे तर उन्हाळ्यात पचनासाठी हलके-फुलके खाद्यपदार्थ, फळे आणि पेय पदार्थ निसर्गापासून आपल्याला मिळतात. त्यात टरबूज, काकडी, खरबूज, द्राक्षे, लिंबू, स्ट्रॉबेरी, सफरचंद, आंबे ही फळे आहेत. या सर्वांमुळे फक्त शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते असे नाही तर शरीराला थंड बनवून पोषणही देतात. त्यातून मिळणारे व्हिटॅमिन्स आणि खनिजे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात आणि त्वचेलाही सुंदर बनवितात. यांचा वापर कच्चे सलाड किंवा ज्यूसच्या रूपात किंवा काही शिजवून (काकडी, कोबी) खाऊ शकतो. त्याव्यतिरिक्त उन्हाळ्यात, जिरे, शोप, वेलची हे मसाले तसेच कैरीचे पन्हे, पुदिना, फळाचा रस, सरबते, चटणी, जलजिरा आदि पदार्थही वस्तूही शरीरासाठी अनुकूल असल्याने अशा पदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ व आहार तज्ज्ञांकडून देण्यात येतो. (प्रतिनिधी)