शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुजित लोट खुनातील आरोपीस जन्मठेप

By admin | Updated: March 27, 2017 18:58 IST

पंचशीलनगरमधील सुजित श्याम लोट (१९) या युवकाचा दोन वर्षांपूर्वी जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकूने वार करून खून

नाशिक : नाशिक-पुणे रोडवरील पंचशीलनगरमधील सुजित श्याम लोट (१९, पंचशील क्लासिक अपार्टमेंट, शिवाजीनगर नाशिक-पुणा रोड) या युवकाचा दोन वर्षांपूर्वी जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकूने वार करून खून करणारा आरोपी चरण नाथा उजागरे (२१, समतानगर, आगरटाकळी रोड, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ सी़ शर्मा यांनी सोमवारी (दि़२७) जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या या खटल्यात सरकारी वकील शिरीष कडवे यांनी बारा साक्षीदार तपासले़या खून खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, मयत सुजित श्याम लोट याने घटनेच्या काही दिवसांपूर्वी आरोपी चरण उजागरे यास चापट मारली होती़ त्याचा राग उजागरेच्या मनात होता़ ११ एप्रिल २०१५ रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास सुजित श्याम लोट व त्याचा मित्र राजू बाबूराव दाणी हे टाकळीरोडवरील टपरीवर सिगारेट पित असताना उजागरे तिथे आला़ याच ठिकाणी सुजितचा भाऊ पवन अशोक लोट यास फोन करून बोलावून घेण्यात आले होते़या टपरीवर लोट व उजागरे यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरू असतानाच उजागरेने हातातील चॉपरने सुजित लोटच्या छातीवर व पोटावर सपासप वार केले व दुचाकीवरून पळून गेला़ यानंतर पवन लोट व राजू दाणी यांनी सुजितला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चरण उजागरेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ न्यायाधीश शर्मा यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खून खटल्यात सरकारी वकील शिरीष कडवे यांनी बारा साक्षीदार तपासले़ साक्षीदार व प्रत्यक्षदर्शींनी दिलेली साक्ष व समोर आलेले पुरावे ग्राह्य धरत आरोपी चरण उजागरे यास जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़