शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मॅग्मो संघटनेची आडमुठी भूमिका सुजाता सौनिक :

By admin | Updated: July 7, 2014 00:51 IST

संघटनेची मागणी नियमबाह्य

 

नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत मॅग्मो संघटना आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याचे आरोग्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रसिद्धिपत्रकांन्वये कळविली आहे़ सार्वजनिक आरोग्य विभागात अस्थाई स्वरूपात कार्यरत असणाऱ्या १४१८ अस्थाई वैद्यकीय अधिकाऱ्यांना २००९ मध्ये शासनाने विशेष बाब म्हणून कोणतीही परीक्षा न घेता शासकीय सेवेत कायम केले. राज्य घटनेच्या कलम ३०९ अन्वये राज्यपालांच्या मान्यतेने या समावेशनाचे नियम तयार करण्यात आले़ त्यानुसार समावेशनानंतर संबंधित संवर्गाच्या वेतन श्रेणीतील प्रारंभिक टप्प्यावर वेतननिश्चिती, ग्रामीण भागात सेवा, नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेनुसार निवृत्ती वेतनाचे फायदे या अटी होत्या़ या अटी मान्य असल्याचे डॉक्टरांकडून हमीपत्र लिहून घेतल्यानंतरच त्यांचे समावेशन केले गेले़ असे असतानाही मॅग्मो संघटना या १४१८ अस्थाई वैद्यकीय अधिकाऱ्यांना समावेशनापूर्वीच्या अस्थाई कालावधीतील खंड क्षमापित करून सर्व वेतनवाढी द्याव्यात व जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी चुकीची मागणी करीत आहे़ संघटनेची ही मागणी समावेशन नियमाच्या विरुद्ध असल्याचे शासनाचे म्हणणे आहे़ दरम्यान, मॅग्मोची ही एक मागणी वगळता उर्वरित सर्व मागण्यांबाबत शासनाची सकारात्मक भूमिका आहे़ मात्र संघटना आडमुठी भूमिका घेऊन आपल्या बेमुदत असहकार आंदोलनावर ठाम असून, डॉक्टरांच्या इतर संघटनांनादेखील वेठीस धरून नागरिकांना वैद्यकीय सेवेपासून वंचित ठेवत असल्याचे शासनाचे म्हणणे आहे़