शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुक्यात दोघा शेतकऱ्यांची आत्महत्त्या

By admin | Updated: April 13, 2017 19:02 IST

कळवण तालुक्यात दोघा शेतकऱ्यांची आत्महत्त्या

नाशिक : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे सत्र सुरूच असून, कळवण तालुक्यात लागोपाठ दोन दिवस दोन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याने जिल्ह्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २१च्या घरात पोहोचली आहे. या दोन्ही आत्महत्त्येप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन अहवाल मागविला आहे. कळवण तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्त्या केल्याची घटना दुर्मिळ मानली जात होती. तथापि, सधन असलेल्या निफाड तालुक्याप्रमाणे कळवण तालुक्यातील शेतकरीही आत्महत्त्या करू लागल्याने प्रशासनाच्या दृष्टीने ती चिंतेची बाब मानली जात आहे. भाऊसाहेब चंद्राजी बंगाळ (वय ५०, रा. आठंबे) यांनी बुधवारी घरात गळफास घेतला, तर ताराचंद रामभाऊ बागुल (वय ६५, रा. नवीबेज, ता. कळवण) यांनी गुरुवारी आपल्याच शेतात गट नंबर २३० मध्ये विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविली. या दोन्ही आत्महत्त्यांच्या घटनेने कळवण तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले असून, कर्जबाजारीपणा वा नापिकीमुळे ही घटना घडली अथवा कसे याचे चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून साधारणत: चार ते पाच शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत, त्यामुळे एप्रिलमध्येही हेच प्रमाण कायम असून, आजवर २१ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत.