शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

पत्नीचा खून करून पतीची रेल्वेखाली आत्महत्त्या

By admin | Updated: February 27, 2017 01:00 IST

चांदवड : तालुक्यातील काळखोडे येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून नंतर पतीने रेल्वेखाली जाऊन आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

चांदवड : तालुक्यातील काळखोडे येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून नंतर पतीने रेल्वेखाली जाऊन आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, खून करणारा संशयित मयत झाला आहे. काळखोडे येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी फुलाबाई आनंदा माळी ( ३५) ही महिला मृतावस्थेत आढळल्याची खबर पोलीस पाटील हर्षाली दत्तू शेळके यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. या घटनेचे वृत्त समजताच चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. काळखोडे येथे त्यांना घटनास्थळी फुलाबाई आनंदा माळी (३५) ही मृतावस्थेत आढळली. तिच्या मृतदेहाजवळच मोठा लोखंडी गज पडलेला दिसला. यावरून या सळईनेच हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात आला. घरात पती नसल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला प्रारंभ केला. सदर घटना मध्यरात्री ते पहाटे सहा वाजेपर्यंत केव्हातरी घडल्याची माहिती त्यांची तिन्ही मुले सांगत होते. तपास सुरू असतानाच थोड्याच वेळात माहिती मिळाली की, पती आनंदा बारकू माळी (४०) याचाही काळखोडे रेल्वे गेटजवळ मृतदेह आढळला आहे. त्यानेही रेल्वेखाली जीव दिला असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरविली. फुलाबाईचा पती आनंदा बारकू माळी हा मुळचा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खरडबारी येथील रहिवासी होता. तो बऱ्याच दिवसांपासून काळखोडे या सासुरवाडीच्या ठिकाणी मोलमजुरी करीत होता. त्याची पत्नी फुलाबाई हिचे माहेर काळखोडे येथीलच असून तिचे भाऊदेखील काळखोडे येथे गावातच राहतात. फुलाबाई हिच्यावर आनंदा माळी चारित्र्याचा नेहमीच संशय घेत होता. यावरून तो तिला मारझोड करीत असल्याचे त्याचे दोन्ही लहान भाऊ सोमा व गोमा यांनी पोलिसांना सांगितले. दि. २६ रोजी मध्यरात्री आनंदा याने फुलाबाईचा लोखंडी गजाने खून केला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असता आनंदा माळी यानेही रेल्वे गेट क्रमांक २४१ च्या रेल्वेलाइनवर जाऊन जीव दिला. या दोघांच्या निधनाची बातमी परिसरात पसरल्यानंतर घटना बघण्यासाठी बघ्याची गर्दी जमली होती. संपूर्ण माळी परिवारावर शोककळा पसरली. फुलाबाई हिचे माहेर गावात काळखोडे येथे असून, वृद्ध आई अंजनाबाई सखाराम सोनवणे आपल्या दोन मुलांसह तेथेच राहते. तिचा एक मुलगा रायपूरला राहतो. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. उपनिरीक्षक कैलास चौधरी, नरेंद्र संैदाणे, व्ही. बी. पवार, जी. आर. निमेकर, चंद्रकांत निकम, मंगेश डोंगरे, बापू चव्हाण, शिवाजी कुशारे आदि पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)आनंदा माळी, फुलाबाई माळी यांना लक्ष्मण (१३), लखन (११), पूनम (९ वर्षे) अशी तीन अपत्ये आहेत. हे तिघेही रात्री घराबाहेरच झोपले होते. सकाळी सहा वाजता तिघेही उठून घरात बघतात तर आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना आढळली. त्यांनी मामा खंडू, पांडू, समाधान व काका सोमा, गोमा यांना बोलाविले.