शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

सराईत गुन्हेगार जया दिवेच्या आवळल्या मुसक्या

By admin | Updated: July 13, 2017 22:58 IST

गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला जया दिवे उर्फ जेडीच्या अखेर मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.

पंचवटी : हनुमानवाडीमधील सुनील वाघ व हेमंत वाघ या दोघा सख्ख्या भावंडांवर हल्ला करत सुनील वाघ यांची हत्या तसेच दिंडोरीरोडवरील रहिवासी मंगेश पाटील या विक्रेत्याच्या खुनामध्ये सहभाग व गोळीबार, मोक्का आदिंसह विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला जया दिवे उर्फ जेडीच्या अखेर मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.मालेगाव स्टँड परिसरात गुरुवारी (दि.१३) दुपारी दिवे येणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे परिसरात सकाळपासूनच गुन्हे शोध पथकाचे साध्या वेशातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दिवे हा मालेगाव स्टँडवर असलेल्या सिद्धी टॉवरच्या इमारतीमध्ये असल्याचे समजताच पोलिसांनी इमारतीला वेढा दिला. दिवे निसटून जाऊ नये, याची पूर्ण तजवीज पोलिसांनी केली. पोलिसांनी शिताफीने दिवेला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.

दिवेकडून विविध गुन्हे उघडकीस येणार असून, फरार गुन्हेगारांची माहिती उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दिवे याने आतापर्यंत चार खून केले असून, परिसरात गोळीबार करून दहशत पसरविणे, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे, प्राणघातक हल्ला, खंडणी वसुली, असे गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून पोलिसांना तो हवा होता. त्याच्या मागावर तसेच गुप्त बातमीदारांमार्फत सातत्याने पोलीस चाचपणी करत होते.