शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या

By admin | Updated: June 20, 2017 01:43 IST

पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : सुकेणकर लेन परिसरात राहणाऱ्या विवाहितेने पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवार (दि.१८) दुपारी सुकेणकर लेन येथील वसंत अपार्टमेंट येथे राहणाऱ्या हर्षा प्रशांत जैन (२५) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती प्रशांत जैन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षा हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी पंचवटीतील जैन याच्याबरोबर झाला होता. त्यानंतर पती प्रशांत याने वारंवार चारित्र्याचा संशय घेत तसेच घरगुती कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. या छळाला कंटाळूनच तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार सुरेश छगन सैतवाल (रा. रावेर) यांनी पंचवटी पोलिसांत दिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मयत जैन हिने एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे उघड झाले असून, चिठ्ठी जप्त केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.