शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार नियुक्तीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 01:00 IST

सटाणा : बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावेत यासाठी वेळोवेळी आंदोलने करूनही दिशाभूल केली जात असल्याने आक्रमक झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याने बुधवारी (दि. ४) तहसील आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. मनसे शहरप्रमुख पंकज सोनवणे यांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले असता पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व पोलीस कर्मचारी पुंडलिक डंबाळे यांनी तातडीने आग विझविल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देबागलाण : मनसे शहरप्रमुखाने डिझेल ओतून घेतले पेटवून; पोलिसांची धावपळ

सटाणा : बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावेत यासाठी वेळोवेळी आंदोलने करूनही दिशाभूल केली जात असल्यानेआक्रमक झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याने बुधवारी (दि. ४) तहसील आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. मनसे शहरप्रमुख पंकज सोनवणे यांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले असता पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व पोलीस कर्मचारी पुंडलिक डंबाळे यांनी तातडीने आग विझविल्याने अनर्थ टळला.बागलाणला पूर्ण वेळ तहसीलदारांची नेमणूक करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत. वेळोवेळी निवेदने देऊन तसेच तहसील कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न करूनही आश्वासनांपलीकडे काहीही होत नसल्याने अखेर मनसे पदाधिकाºयांनी या मागणीसाठी डिझेल भरलेले डबे हातात घेऊन तहसील कार्यालयाजवळ आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला.प्रत्येक मनसे पदाधिकाºयाने स्वतंत्रपणे आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदनदेखील तहसील कार्यालयासह पोलीस ठाण्याला दिले होते. त्यानुसार, बुधवारी ठरल्याप्रमाणे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज सोनवणे, तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, शहराध्यक्ष पंकज सोनवणे, शहर सरचिटणीस मंगेश भामरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे, मनसे उपशहर अध्यक्ष नीलेश नंदाळे, उपशहर अध्यक्ष हेमंत इंगळे, उपतालुकाध्यक्ष विश्वास खैरनार व अन्य आठ-दहा कार्यकर्त्यांनी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास डिझेल सोबत आणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यात मनसेचे शहरप्रमुख पंकज सोनवणे यांनी तर अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले. परंतु, पोलिसांनी लगेच झडप घालत आग विझविल्याने अनर्थ टळला.‘ाश्वासनांवर आश्वासनेमनसे पदाधिकाºयांनी सुरु वातीच्या काळात बागलाणसाठी कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा या मागणीसाठी वरिष्ठ अधिकाºयांना निवेदन दिले होते. त्यानंतरही त्यांच्या मागणीची दखल न घेतली गेल्याने त्यांनी तहसील कार्यालयाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीदेखील लवकरच वरिष्ठ पातळीवर याची दखल घेऊन कायमस्वरूपी तहसीलदार नेमण्याचे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनालादेखील चार महिने उलटले असून, अद्यापपर्यंत पूर्णवेळ तहसीलदार न मिळाल्याने मनसे पदाधिकाºयांनी अखेर आत्मदहनाचा मार्ग निवडला. बागलाणला गेल्या आठ महिन्यांपासून पूर्णवेळ तहसीलदार नसल्याने नागरिकांची अनेक शासकीय कामे रखडली आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शालेय कामकाजासाठी दाखलेदेखील वेळेवर उपलब्ध होत नाहीत. वेळोवेळी निवेदने देऊन तहसीलला कुलूप लावण्याचा प्रयत्नही झाला होता.