शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:18 IST

पतीसोबत सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादात पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत महिलेने गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ करीत विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालयात घडली़

नाशिक : पतीसोबत सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादात पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत महिलेने गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ करीत विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालयात घडली़ रेहाना मुजरीम खान (पार्कशेड अ, पार्कसाइड अपार्टमेंट, वडाळा- पाथर्डी रोड, इंदिरानगर, नाशिक) असे या महिलेचे नाव आहे़ या महिलेस उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तिच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, पोलिसांनी गोंधळ घालणाºया नातेवाइकांना ताब्यात घेतले आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेहाना खान या महिलेचे पती मुजरीम खानसमवेत मालमत्तेवरून वाद सुरू आहेत़ तिचा पती तिच्यासोबत राहत नसून या प्रकरणात पोलिसांनी मदत करून मालमत्ता मिळवून द्यावी, अशी रेहाना व तिच्या नातेवाइकांची मागणी असून, यासाठी ते दुपारी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गेले होते़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांनी हा दिवाणी दावा असून, न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला़ यामुळे रेहाना व तिच्या नातेवाईक दाद मागण्यासाठी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्तालयात पोहोचले़ पोलीस आयुक्तालयातील दुसºया मजल्यावर पोलीस अधिकाºयांची बैठक सुरू असल्याने त्यांना बसण्यास सांगण्यात आले़ याचा राग आल्याने नातेवाइकांनी पोलिसांना शिवीगाळ करीत गोंधळ घातला व दुसºया मजल्यावर पोहोचले़दरम्यान, या काळातच रेहाना खान या महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला़ यामुळे पोलीस आयुक्तालयात एकच गोंधळ उडाला व पोलिसांनी नातेवाइकांना ताब्यात घेत विषारी औषध प्राशन केलेल्या रेहाना हिस इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक बेल्हेकर यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़